पुणे जिल्हा राष्ट्रवादी कौंग्रेसच्या जिल्हा कोषाध्यक्ष पदी - सचिन बोगावत


पुणे जिल्हा राष्ट्रवादी कौंग्रेसच्या जिल्हा कोषाध्यक्ष पदी - सचिन बोगावत

भिगवण (प्रतिनिधी)नानासाहेब मारकड 

पुणे जिल्हा राष्ट्रवादी कौंग्रेसच्या जिल्हा कोषाध्यक्ष पदी सचिन बोगावत यांची निवड करण्यात आली आहे.

 पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दतात्रय भरणे यांच्या शुभहस्ते बोगावत याना निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुन लाड,जिल्हा परीषद सदस्य अभिजीत तांबिले, इंदापूर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष धनंजय थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, मा. सरपंच महेश शेंडगे, मा.उपसरपंच प्रदीप वाकसे कमलेश गांधी  मच्छिंद्र खारतोडे आदी मान्यवर उपस्थित होते

सचिन बोगावत हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा क्रियाशील कार्यकर्ता असुन भिगवण शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष,रोटरी क्लब चे प्रांतपाल म्हणून काम करत आहेत. या भिगवण परीसरातील अनेक गावात रोटरीच्या माध्यमातून समाजपयोगी  आणि लोकहिताची कामे केली आहेत. 

यावेळी निवडीनंतर सचिन बोगावत यांनी सांगितले की , राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ,राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खासदार सुप्रिया सुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार व्यक्त करुन पुणे जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन आणि बळकटीकरण करन्याच काम करणार आहे. मी माझा पदाचा वापर तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करणार असल्याचे यावेळी बोगावत यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News