दौंडच्या तरुणांचा स्तुत्य उपक्रम,गोरगरीब जनतेची दिवाळी केली गोड


दौंडच्या तरुणांचा स्तुत्य उपक्रम,गोरगरीब जनतेची दिवाळी केली गोड

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:-- कोरोना महामारीने संपूर्ण जग थांबले आहे,भल्याभल्याना कोरोनाची झळ बसली आहे, अशा परिस्थिती मध्ये हातावर पोट असलेल्या गोरगरीब लोकांची दिवाळी अंधारात गेली आहे,परंतू दौंड शहरातील गोरगरीब जनतेची दिवाळी दौंड मधील   स्लोग-ह्युमन हेल्प फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी फराळ वाटून साजरी केली,आजच्या भरकटलेल्या तरुणांना मोलाचा संदेश या यंगिस्तान ने दिला आहे,देशात कोरोनासारख्या विषाणूने थैमान माजवले असल्याने सर्व धार्मिक व सामाजिक उत्सव बंद केल्याने सर्वांच्या हाती निराशाच आली असल्याने दिवाळी मात्र निराशेमध्ये गेल्याने जनता मात्र नाराज आणि दुःखी असल्याचे दिसून येत आहे.त्यांची नाराजी दूर करून व त्यांना धीर देऊन त्या बांधवांसोबत मिठाई व फराळ देऊन दिवाळी साजरी करण्याचा एक छोटासा प्रयत्न ह्यूमन हेल्प फाउंडेशन तर्फे करण्यात आला.फाउंडेशन चे अध्यक्ष:कु:पवन साळवे,उपाध्यक्ष:प्रज्ञेश कांबळे,सचिव:शेखर पाळेकर,खजिनदार:सुमीत गायकवाड,राहुल कोकरे किरण गायकवाड व मार्गदर्शक म्हणून कुणाल वाघमारे, पिंकू झेंडे,प्रमोद रानेरजपुत, निखिल स्वामी युनूस पानसरे यांचे सहकार्य लाभले. या तरुणांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News