स्वतःच्या बापाला लाकडी दांडक्याने मारण्याचा प्रयत्न: घुगलवडगाव येथील भयानक घटना.


स्वतःच्या बापाला लाकडी दांडक्याने मारण्याचा प्रयत्न: घुगलवडगाव येथील भयानक घटना.

अंकुश तुपे, श्रीगोंदा प्रतिनिधी दि.१८: दारूच्या नशेत घरात बडबड केल्याचा राग येऊन घुगलवडगाव ता. श्रीगोंदा येथील मुलानेच रागाच्या भरात स्वतःच्या वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.यात वडील गंभीर जखमी झाले आहेत.

         याबाबत सविस्तर वृत्त असे की घुगलवडगाव ता. श्रीगोंदा येथील भाऊसाहेब गोपाळा चव्हाण (वय ५५) हे दि.१७ रोजी सायंकाळी दारू पिऊन आले होते. दारूच्या नशेत त्यांनी मी दुसरे लग्न करीन व तुमच्या कपाळाला माती शिल्लक ठेवणार नाही असे म्हणल्याचा राग येऊन त्यांचा मुलगा दत्तात्रय भाऊसाहेब चव्हाण (वय ३०)  याने वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केला. त्यामुळे भाऊसाहेब यांना डोक्याच्या बाजूस गंभीर दुखापत झाली. वादाचा आवाज ऐकून त्यांचा दुसरा मुलगा संभाजी व सून राणी धावत आली. रक्ताच्या थारोळ्यात पाहून संभाजी याने तातडीने भाऊसाहेब यांना पुणे येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

         या प्रकाराची भाऊसाहेब यांच्या सुनबाई राणी संभाजी चव्हाण यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आरोपी दत्तात्रय भाऊसाहेब चव्हाण यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तक्रार दाखल केली. श्रीगोंदा पोलिसांनी दत्तात्रय याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस करत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News