पोलीसाकरीता मिठाईच्या माध्यमातून जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न संजय जोशी


पोलीसाकरीता मिठाईच्या माध्यमातून जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न संजय जोशी

दिवाळीनिमित्त तोफखाना पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सावेडी उपनगरातील गुलमोहोररोडवरील बन्सीमहाराज अन्नपूर्णा वतीने शहर उपविभागीय पोलीस अधिक्षक विशाल ढुमे व गोविंद जोशी यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक एच.पी.मुलाणी, सहा पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे , पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, अशोक जोशी, संजय जोशी, कौशल जोशी, कृष्णा जोशी आदी.छाया संजय जोशी

दिवाळी मिठाईमुळे पोलीस दादाच्या  चेहऱ्यावर आले हास्य व आनंदाश्रु

तोफखाना पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले बन्सीमहाराज अन्नपूर्णा वतीने  दिवाळीची  मिठाई  

नगर( प्रतिनिधी संजय सावंत) बन्सी महाराज अन्नपुर्णा दालनाला ९९ वर्षांची दीर्घ परंपरा  आहे पारंपारीक दिवाळी फराळाच्या पदार्थांसह विविध बन्सीमहाराज मिठाई तसेच देशी विदेशी मिठाईना मागणी आहे. पोलीस सातत्याने कोणत्याही  उन्हापावसाचा विचार न करता  तसेच सण वार चोवीस तास नागरिकांच्या सेवेकरीता असतात कोरोनाच्या काळातही त्यांनी काम केले.घराकडेही वेळ देता येत नाही अश्या पोलीसाकरीता मिठाईच्या माध्यमातून जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करत आहोत असे प्रतिपादन  बन्सी महाराज अन्नपुर्णाचे संजय जोशी यांनी केले. दिवाळीनिमित्त तोफखाना पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सावेडी उपनगरातील गुलमोहोररोडवरील बन्सीमहाराज अन्नपूर्णा वतीने शहर उपविभागीय पोलीस अधिक्षक विशाल ढुमे व गोविंद जोशी यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक एच.पी.मुलाणी, सहा पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे , पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, अशोक जोशी, संजय जोशी, कौशल जोशी, कृष्णा जोशी आदी उपस्थित होते. विशाल ढुमे म्हणाले की,बन्सीमहाराज अन्नपूर्णा करत असलेला उपक्रम कौतुकास्पद आहे ज्या समाजात आपण रहातो त्या समाजाकरीता अश्या माध्यमातून नक्कीच चांगला संदेश पोहचेल पोलीसाच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचे काम जोशी परीवार सातत्याने करत आहे. यावेळी मोठया संख्येने सर्व पोलीस कर्मचारी वृंद उपस्थित होता.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News