छायाचित्र मतदार याद्यांचा पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर.....नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे आवाहन


छायाचित्र मतदार याद्यांचा  पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर.....नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे आवाहन

शिर्डी, राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी.

भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचेकडून दि. 01 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्‍त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश मतदानापासून वंचित राहिलेल्‍या मतदारांना आणि नवीन मतदार म्‍हणून पात्र असलेल्‍या मतदारांना संधी देणे तसेच नाव नोंदणी वाढविणे व चुका विरहित मतदार याद्या तयार करणे हा आहे. सदर मतदार याद्या पुन:रिक्षण कार्यक्रम दि. 30 सप्‍टेंबर 2020 पासून राबविला जात असून तो 15 जानेवारी 2021 पर्यंत  राबविला जाणार आहे.    मतदार यादी विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक 17 नोव्‍हेबर 2020 रोजी एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवमतदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाली असून प्रत्येक मतदाराने प्रारुप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही, याची खात्री करावी. मतदार यादीत नाव नसल्यास त्यासाठी आपला फॉर्म नमुना-6 म्हणजेच मतदार नांव नोंदणीसाठी आवश्यक नमुना फॉर्म भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्रात जमा करावा. ज्या व्यक्तीचे दि. 01 जानेवारी 2021 रोजी वय 18 वर्ष पूर्ण होत आहे, परंतु मतदार यादित नांव नाही,अशा व्यक्तीने आपले नांव मतदार यादीत समाविष्ट करुन घेणेसाठी फॉर्म नमुना -6 भरुन द्यावा. ज्या मतदाराच्या मतदार यादितील तपशिलात (नांव,वय,लिंग,फोटो) इ. मध्ये काही चुका असल्यास त्या दुरुस्त करुन घेणेसाठी फॉर्म नमुना-8 भरुन द्यावा.अहमदनगर जिल्ह्याच्या मतदार यादीत मयत, दुबार, स्थलांतरीत मतदारांची संख्या अद्यापही आढळून येत असल्यामुळे त्या नावांची वगळणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदारांनी स्वत: पुढाकार घ्यावा. व मयत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची नांवे मतदार यादीमधून वगळण्याची कार्यवाही करावी. कुंटुंबातील एखादी व्यक्ती मयत झाली असल्यास त्या व्यक्तीचे नांव मतदार यादिमधून वगळण्यासाठी मृत्युच्या दाखल्यासह फॉर्म नमुना-7 भरुन द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासंदर्भात, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी अधिक माहिती दिली.  ते म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यात मतदार यादीत ज्या मतदारांचे नावे दुबार आहेत. अशा दुबार मतदारांनी आपण ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे वास्तव्य करतो, त्या ठिकाणी मतदार यादीत नांव कायम ठेवून उर्वरीत ठिकाणची नावे वगळणेसाठी फॉर्म नमुना-7 भरुन देणे. मतदाराचे जर बदली किंवा इतर कारणामुळे स्थलांतर झाले असल्यास, त्याने पूर्वीच्या ठिकाणच्या नांवाची वगळणी करावी व नवीन रहिवासाच्या ठिकाणी नांव मतदार यादीत समाविष्ट करावे. अहमदनगर जिल्ह्याच्या मतदार यादिमध्ये ज्या मतदारांचे फोटो नाहीत, अशा मतदारांनी आपला पासपोर्ट साइज फोटो आपले संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे जमा करावा. 18 ते 19 वर्षे वयोगटातील मतदारांची नांव नोंदणी वाढविणेसाठी संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी पुढाकार घेउन महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्याचे वय दिनांक 01 जानेवारी 2021 रोजी 18 वर्ष पूर्ण झाले आहे, परंतु मतदार यादित नांव नाही अशा विद्यार्थांची नांव नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.       

अहमदनगर जिल्ह्याच्या मतदार यादित स्त्री-पुरुष प्रमाण 923 इतके आहे. त्यामुळे महिला मतदारांची नांव नोंदणी वाढविण्यासाठी गावातील अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,महिला बचतग़ट,यांनी यासाठी गावोगावी विशेष मोहिम घेउन गावातील ज्या महिलांचे वय दिनांक 01 जानेवारी 2021 रोजी 18 वर्षपूर्ण होत आहे. परंतु मतदार यादित नांव नाही अशा महिलांची नांवे मतदार यादित समाविष्ट करुन घ्यावी, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News