राहुरी फॅक्टरी (कराळे वाडी) येथील रस्त्यातील अडथळे दूर करावेत


राहुरी फॅक्टरी (कराळे वाडी) येथील रस्त्यातील अडथळे दूर करावेत

राहुरी प्रतिनिधी (प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे)                                      राहुरी तालुक्यातील, राहुरीफक्टरी(कराळेवाडी)येथील प्लॉट  नं 559/2/15  या देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीतील ठिकाणी राहिवाश्यांच्या जाणे येणे करिता जो रस्ता आहे , त्या रस्त्यामध्ये एका राहनदाराच्या इमारतीचे काम  पूर्ण होऊन बरेच दिवस झाले आहेत,परंतु ज्या काही विटा शिल्लक राहिल्या आहेत,त्या विटा कै,डॉ ,महाडिक यांच्या भिंतीला लावून दिल्या आहेत ,त्या मुळे त्या विटांच्या ढिगाऱ्याखाली विषारी स्वापदे घर करून राहून शेजारील राहिवाश्यांना धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे,या करिता खबरदारी म्हणून देवळाली प्रवरा नगर पालिकेने त्वरित लक्स घालून संबंधित इसमास त्या उर्वरित विटा अनेत्र हलविण्यास तातडीने नोटिस देण्यात यावी, व कार्यवाही करावी. त्या नंतर शेजारीच एका रहीवाश्याने रस्त्यातच त्यांच्याच भिंतीला खेटून पाणी साठविणे करिता एक सिमेंटची  मोठी टाकी  ठेवली आहे, त्या टाकीची स्वछता राहत नसल्याने  गल्लीत व परिसरात कोरोना सारखा महाभयंकर आजार  पसरतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे,तसेच सदर इसमाने उन्हाळयात कुरडई बनवण्यासाठी  जे चुलंघन बनवले होते, ते मोठाले दगड देखील रस्त्यात भिंतीच्या कडेला टाकून देऊन रस्त्यात अडचण निर्माण केल्यामुळे राहिवश्यांना आपली वाहने ने आन करण्यास व वळविणे कामी मोठी कसरत करावी लागत आहे,त्या मुळे अपघात देखील घडू शकतो,  दुर्दैवाने  मोठी दुर्घटना घडू शकते,या परिसरात रस्त्यात अडथळे निर्माण करणारे हे दोनही महाभाग अशीक्षीत व अडमुठे असल्याने समजून सांगण्याच्या पलीकडे त्यांची बिकट अवस्था आहे, प्रत्येकाला ही बाब सतत खटकत आहे ,परंतु :मांजराच्या गळयात घंटा कोणी बांधावी ; ही भीती निर्माण झाली आहे म्हणून देवळाली प्रवरा ता,राहुरी ,जिल्हा ,अहमदनगर या  नगर पालिकेने या कामी त्वरित लक्स घालून संबंधित रस्त्यातील अडथळे त्वरित दूर करावेत ,अशी मागणी करण्यात येत आहे,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News