नगरमध्ये रिक्षातून 57 लाखाचे सोने जप्त एक आरोपी अटक


नगरमध्ये रिक्षातून 57 लाखाचे सोने जप्त एक आरोपी अटक

अहमदनगर :(प्रतिनिधी  संजय सावंत) हरामध्ये रात्री संशयास्पद फिरणार्‍या रिक्षाची पोलिसांनी झडती घेतली असता यामध्ये 56 लाख 89 हजार 690 रूपये किंमतीचे 1 किलो 368 ग्रॅम वजनाचे सोने आढळून आले. पोलिसांनी ते सोने जप्त केले असून फैरोज रफीक पठाण (रा. बाबा बंगाली, नगर) याला अटक केली आहे. कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, ही सोन्याची बॅग पठाण याला गंजबाजार परिसरात सापडली असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी पठाण विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांचे पथक बाबा बंगाली परिसरात गस्त घालताना संशयास्पद रिक्षा दिसून आली. या रिक्षा चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाऊ लागला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी रिक्षा चालकाला पकडले. त्याचे नाव विचारले असता त्याने फैरोज पठाण, असे सांगितले. रिक्षाची झडती घेतली असता रिक्षामध्ये 1 किलो 368 ग्रॅम सोने असलेली बॅग मिळून आली. या सोन्या विषयी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने पोलिसांना ठोस पुरावे दिले नाही. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी नितीन रणदिवे, पो.ना.योगेश भिंगारदिवे, शाहीद शेख, रियाज इनामदार, सुजय हिवाळे, प्रमोद लहारे, सुमित गवळी, भारत इंगळे यांनी केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News