माजी सैनिकांवर उपोषण करण्याची वेळ,जमिनीवर स्थानिक लोकांचा कब्जा,न्यायासाठी श्रीगोंदा तहसील समोर उपोषण


माजी सैनिकांवर उपोषण करण्याची वेळ,जमिनीवर स्थानिक लोकांचा कब्जा,न्यायासाठी श्रीगोंदा तहसील समोर उपोषण

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

-- श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथील रहिवाशी असलेले माजी सैनिक किसन सखाराम नवले व दादा मारुती नाडे या दोन माजी सैनिकांच्या जमिनीवर काही स्थनिक लोकांनी जबरदस्ती कब्जा केल्यामुळे न्यायासाठी ते श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसणार आहेत,त्यांची हकीकत अशी की माजी सैनिक किसन नवले व दादा नाडे यांना 1976 मध्ये सिलिंग मध्ये मौजे येळपणे येथे दोघांना प्रत्येकी तीन हेक्टर शेत जमीन सर्व्हे नंबर 64 गट नंबर 91 कायम स्वरूपी मिळाली आहे,ती जमीन त्यांनी 1990 पर्यंत कसली आहे,परंतू काही लोकांनी राजकीय दबाव वापरून महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीर नोंदी करून घेतल्या असल्याचे नवले आणि नाडे यांचे म्हणणे आहे,त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत -- आम्हाला न्याय मिळण्यासाठी तात्काळ उच्च स्तरीय चौकशी कमिटी मार्फत सदर प्रकरणाची चौकशी करून नुकसान भरपाई सह मोजणी करून शासनाने जमिनीचा ताबा द्यावा,तसेच जमीन बळकावनाऱ्या गावगुंडांवर अक्ट्रॉसिटी सह फौजदारी कारवाई करावी या मागण्यांसाठी त्रिदल सेवा संघ अध्यक्ष संदिप लगड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पदाधिकारी व किसन नवले आणि दादा नाडे हे दोघेजण दिनांक 17/11/20 रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करणार आहेत अशी माहिती सिने अभिनेते विजय नवले यांनी दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News