बेटवाडी होलेमळा येथे आज 8 जण कोरोना पॉझिटिव्ह,लहान मुलांसह महिलांनाही भरले एम्ब्युलन्समध्ये,परिसरात भितीचे वातावरण


बेटवाडी होलेमळा येथे आज 8 जण कोरोना पॉझिटिव्ह,लहान मुलांसह महिलांनाही भरले एम्ब्युलन्समध्ये,परिसरात भितीचे वातावरण

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

पाटस  -- दौंड तालुक्यातील  बेटवाडी येथे मागील आठ दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, आज सुट्टी असूनही होले मळा येथे 52 लोकांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली, त्यामध्ये 8 जण कोरोना बाधीत असल्याची माहिती डॉ शिवराणी पांचाळ यांनी दिली आहे, परंतू पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना पाटस येथील कोविड सेंटरवर घेऊन जाण्यासाठी एम्ब्युलन्स आल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण तयार झाले होते, त्या रुग्णांना माहिती देऊन त्यांच्या पद्धतीने त्यांना पाटसला येऊ द्यायला हवे होते यामुळे रुग्णांचे नातेवाईक घाबरले आहेत असे येथील संपत होले यांनी म्हटले आहे,पाटस कोविड सेंटरचे आरोग्य सेवक भीमराव बडे, आरोग्य सेविका यांनी जिल्हा परिषद शाळा होले मळा बेटवाडी येथे आज रॅपिड अँटजेन तपासणी केली  52 लोकांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये आठ व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत दोन महिला, पाच पुरुष व एक लहान मुलगा असे आठ जण रुग्ण सापडले,त्यांना डॉ गावडे यानी सहकार्य का केले,या सर्व रुग्णांना एम्ब्युलन्स बोलवून कोविड सेंटरला घेऊन गेले,गावात एम्ब्युलन्स आल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते, बरेच लोक भीतीपोटी तपासणी करण्यासाठी आलेच नाहीत,आज लोकांना कोरोना विषयी मानसिक आधाराची गरज आहे,आजची परिस्थिती पाहता लोक भीतीने तेथे येण्यास टाळाटाळ करीत होते अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News