शिर्डीत भगवंताचे दर्शन भक्तांना झाले, हा साधू संतांचा विजय आहे....आचार्य भोसले,


शिर्डीत भगवंताचे दर्शन भक्तांना झाले, हा साधू संतांचा विजय आहे....आचार्य भोसले,

शिर्डी  राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी:

आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व मंदिरे खुले करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे, या मंदिरे खुले करण्याबाबत भारतीय जनता पार्टीचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार जी भोसले यांनी शिर्डी मध्ये राज्यव्यापी आंदोलन केले होते, या आंदोलनादरम्यान त्यांना या शिर्डी ठिकाणी अटक व सुटका देखील झाली होती, त्यांच्याबरोबर अनेक साधू संत उपोषणाला बसले होते, आज मंदिरे खुले झाल्याने त्यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, आज आमच्यासाठी सर्व साधुसंतांच्या साठी खूप भाग्याचा दिवस आहे, तसेच माझ्यासाठी मला माझ्या वाढदिवसाच्या दिनी श्री साई बाबांच्या चरणी लीन होता आले, आज भगवंताचे दर्शन झाले हा महाराष्ट्रातील तमाम साधुसंतांचा विजय आहे, आमच्या आंदोलनाला यश आले, हा हिंदुत्वाचा विजय झाला आहे, भगवंताने या ठाकरे सरकारला सद्बुद्धी दिली आहे, म्हणूनच आजच्या दिनी मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला, याठिकाणी ठाकरे सरकारचा अहंकार गळून पडला, म्हणून आमचा संघर्ष आज संपलेला आहे,मि साईबाबांचे दर्शन घेताना साधू संतांवर होणारे हल्ले थांबावेत, महाराष्ट्रात होणाऱ्या हत्या, राज्यात होणारा अन्याय, अत्याचार, दुराचार, थांबवा त्याचप्रमाणे मीडियाची होणारी गळचेपी ही थांबली गेली पाहिजे शेतकरी हा संकटात आहे, राज्य सरकार चे कर्मचारी आत्महत्या करत आहेत, आणि म्हणूनच मी मी हे सगळ थांबावं म्हणून साईबाबांना इडा पिडा टळु दे व धर्माच राज्य येऊ दे असे साईबाबांना साकडे घातले आहे, तसेच कुणी काहीही म्हणत असेल पण आम्ही श्रेय घेण्याचा विषय घेतला नाही हा विजय साईभक्तांचा आहे आम्ही श्रेयाचा विषय कधी काढलाच नाही, जाणीवपूर्वक मंदिरे बंद ठेवले गेले होते ते व ते आज खुली करण्यात आली म्हणूनच आमच्या सर्वांसाठी हा भाग्याचा दिवस आहे, सर्व भक्तांमध्ये आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होत आहे, यापुढे महाराष्ट्रात राज्यभर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात भावना घालवण्यासाठी तसेच जनजागृती करण्यासाठी राज्यभर सर्व प्रमुख मंदिरांच्या दर्शन स्थळी जाऊन दर्शन घेऊन यात्रा करणार आहोत असेही याठिकाणी आचार्यजी भोसले यांनी सांगितले

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तमाम पदाधिकारी युवा मोर्चाचे पदाधिकारी त्याचप्रमाणे अनेक शिर्डी ग्रामस्थ यावेळी दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते त्याचप्रमाणे आचार्यजी भोसले यांचा वाढदिवस असल्याकारणाने त्यांचा सत्कार उत्तर नगर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्रजी गोंदकर यांनी केला,या प्रसंगी रवींद्र गोंदकर ,रवी कोते ,दीपक वारुळे, विकास कोते,गणेश जाधव,लखन बेलदार, प्रसद शेलार, अमोल कोते,सचिन घुले,अमोल बढे,सागर जाधव, प्रशांत थोरात, अक्षय मुळे,प्रविन भोइर, विशांल नागपुरे,राजू बलसाने, हितेश मोटवानी, आकाश आडांगळे,महेश सुपेकर, संतोष बहिरट, नरेश सुराणा, राहुल घुले,राजेंद्र  बर्डे, बेलदार, आदी उपस्तीत होते ,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News