चोपडजला सभापती काकडे यांच्या हस्ते लक्ष्मीमंदीर सभामंडपाच्या कामाचे भुमीपुजन संपन्न


चोपडजला सभापती काकडे यांच्या हस्ते लक्ष्मीमंदीर सभामंडपाच्या कामाचे भुमीपुजन संपन्न

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील चोपडज याठिकाणी लक्ष्मी मंदीर सभामंडपाच्या कामाचे भुमीपुजन पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रमोद काकडे यांच्या हस्ते दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले.

  या कामासाठीचा निधी पंचवीस पंधरा या लेखा शिर्षाअंतर्गत मंजूर करण्यात आला असून ह्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे मत काकडे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी काकडे यांचा चोपडज ग्रामस्थ व उमेश गायकवाड मित्र मंडळाकडून फेटा बांधून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 यावेळी माजी उपसरपंच उमेश गायकवाड,  माजी पोलीस पाटील लक्ष्मण गायकवाड, गौतम गायकवाड, बाबासाहेब धुमाळ, निकमभाऊ, ऍड. इम्रान खान, निलेश भंडलकर, सुरेश भंडलकर, बाळासाहेब जगताप यासह ग्रामस्थ उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी सरपंच संजय ननवरे यांनी तर आभार उमेश गायकवाड यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News