आदिवासीं बांन्धवांन सोबत दिवाळी साजरी करण्यात खरा आंनद ....सुदेश पाटील आदिवासीं मध्ये आनंदाचे वातावरण.


आदिवासीं बांन्धवांन सोबत दिवाळी साजरी करण्यात खरा आंनद ....सुदेश पाटील    आदिवासीं मध्ये आनंदाचे वातावरण.

शिर्डी ,राजेंद्र दूनबळे प्रतिनिधी

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान व शिव प्रतिष्ठाण ग्रुप उरण,श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोली-उरण यांच्या संयुक्त विद्यमाने  कल्ले वाडी (पनवेल) येथे आदिवासी वाडी वस्त्यांवर  दीपावली निमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम मोठया   उत्साहात संपन्न झाला.यावेळी वाडी वस्ती मध्ये असलेल्या प्रत्येक घरात जाऊन आदिवासींना दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. अनेक समस्यांनी ग्रस्त व समाजापासून दूर डोंगरात, जंगलात अतिशय बिकट परिस्थितीत जगणाऱ्या आदिवासीं मध्ये फराळ वाटपाच्या कार्यक्रमामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 

स्वतःसाठी माणूस जगतो परंतु दुसऱ्याच्या साठी जगण्यात खरा आंनद,आहे हीच माणुसकीची शिकवण घेऊन मंडळातील सदस्य काम करत आहे

यात सुदेश पाटिल, हेमंत पवार, समीर पाटील, सुरज पवार , आकाश पवार, प्रेम म्हाञे, ओमकार म्हात्रे, सुविध म्हाञे, शुभम ठाकुर,संजोग पाटील, नितेश पवार, सागर म्हाञे, गणेश म्हात्रे, अनुदिप पवार, मोहित र्वतक, प्रणय पाटील, प्रणय ठाकुर, साहिल म्हात्रे, सुरज केळवने, प्रकाश म्हात्रे, मोहित गावंड, आर्यन पाटील, भाविक पाटील, अर्णव पाटील आदी शिवभक्त ,  संघटनेचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी या सामाजिक कार्यात सहभाग घेतला.सामाजिक बांधिलकि जपत गोरगरिबांसोबत दरवर्षी दिवाळी साजरा करण्यात येते अश्या सामाजिक उपक्रमातून आदिवासी समाजातील व्यक्तींच्या सुख दुःखात सहभागी होता येते.त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न व समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामील करून घेण्यासाठी असे उपक्रम संघटनेमार्फत नेहमी राबविले जातात  असे छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान व शिवप्रतिष्ठानचे उरण तालुकाध्यक्ष सुदेश पाटील यांनी सांगीतले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News