दौंड तालुक्यात वाळू माफियांवर Dysp राहुल धस आणि पथकाची सर्वात मोठी कारवाई, 2 कोटी 36 लाखाचा मुद्देमाल पाण्यात नष्ट


दौंड तालुक्यात वाळू माफियांवर Dysp राहुल धस आणि पथकाची सर्वात मोठी कारवाई, 2 कोटी 36 लाखाचा मुद्देमाल पाण्यात नष्ट

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :--दौंड तालुक्यात वाळू माफियांवर दोन दिवसात दुसरी धडाकेबाज कारवाई,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना शिरपूर हद्दीतील नदीपात्रात मोठया प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार उपविभागीय कार्यलयातील नंदकुमार केकान,दिपक वाईकर,सुभाष डोईफोडे,धनंजय गाढवे,चालक विजय पवार,होमगार्ड प्रशांत चितारे तसेच बारामती येथील आरसिपी पथकातील पोलीस कर्मचारी या सर्वांनी मिळून शिरपूर येथे जाऊन पहाणी केली असता सदरची मिळालेली माहिती खरी असल्याचे निदर्शनास आले होते, त्याठिकाणी 9 फायबर यांत्रिकी  बोटी,8 सेक्शन बोटी,30 ब्रास वाळू,एक जेसीबी मशीन असे दिसून आले, पोलीसांची चाहूल लागताच सर्वजण पसार झाले,DYSP राहुल धस यांच्या आदेशानुसार सर्व 9 फायबर यांत्रिकी बोटी,8 सेक्शन बोटी,30 ब्रास वाळू नदीपात्रात खोल पाण्यात बुडवून टाकण्यात आले तर जेसीबी मशीन ताब्यात घेण्यात आले आहे असा एकूण 2 कोटी 36 लाख 25 हजार (2,36,25000) रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे,सदर बाबत पोलीस कॉन्स्टेबल धनंजय गाढवे यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात 1) नाना गवळी राहणार कानगाव तालुका दौंड,2) बंडू सातव राहणार शिरापूर तालुका दौंड 3) विठ्ठल माळवदकर राहणार बाभूळगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर,4) दत्ता गायकवाड राहणार जिंती तालुका करमाळा,5) संदिप काळे राहणार आलेगाव,6) हरिभाऊ होलम राहणार शिरापूर,7) सलमान मुलाणी राहणार भिगवण,8)संदिप उर्फ सॅडी काश्मिरे राहणार घंटाचाळ दौंड,9) गिरीश मूलचनदानी राहणार दौंड,10) बाळू मोरे राहणार शिरापूर,11) गोविंद मल्हारी भिसे राहणार शिरापूर व इतर कामगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे उपविभागीय अधिकारी राहुल धस यांनी सांगितले.सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP 4राहुल धस आणि त्यांच्या टीमने केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News