देऊळगाव गाडा येथे दिवसाढवळ्या वाळू, मुरूम व माती उपसा, महसुलचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष


देऊळगाव गाडा येथे दिवसाढवळ्या वाळू, मुरूम व माती उपसा, महसुलचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी:

देऊळगाव गाडा (ता. दौंड) परिसरात  दिवसाढवळ्या बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात वाळू, मुरूम व माळ माती उपसा सुरु आहे. 

           देऊळगाव गाडा  येथे अवकाळी पावसामुळे ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू वाहुन आलेली आहे. त्यामुळे वाळू मुरूम व माती चोर या ठिकाणी जे. सी. बी मशीनच्या साहाय्याने वाळू मुरूम व माती उपसा करीत आहेत.  वाहतुकदार लोकंच्या  जीवाची पर्वा न करता ट्रक चालवत आहेत. ही वाहतूक रात्रीच्या वेळी होत असल्यामुळे येथील नागरीकांना या आवाजामुळे झोपही मिळत नाही. येथील  मोठ्या प्रमाणात हायवा या अवजड ट्रकमध्ये भरुन विक्री साठी नेली जात आहे. त्यामुळे दौंड तालुक्याच्या देऊळगाव गाडा  भागातील नुकतेच तयार केलेले कच्चे रस्ते डांबरी रस्ते खचले आहेत. या अवजड ट्रक वाहतुकी पासून रस्ते वाचवण्यासाठी नागरिक प्रयत्न करीत आहेत. परंतु ही वाळू, मुरूम, माती वाहतुक अर्ध्या रात्री अथवा पहाटेच्या सुमारास केली जात आहे.

        वाळू   मुरूम व माती चोरांवर महसुल विभाग तात्पुरती जुजबी कारवाई करीत आहे. अनेक मुरूम व माती चोर महसुल खाते आमचे काहीच करु शकत नाही असे बोलतात. त्यामुळे महसुल विभागाच्या या करवाईवरच प्रश्न उपस्थित केला जात आहे.  सोकावलेले वाळू मुरूम व माती तस्कर कोणालाही घाबरत नाहीत. या चोरीतून मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध होत असल्याने बाळू मुरूम व माती चोर कोणत्या स्थराला जातील याचा नेम नाही.. वाळू मुरूम व माती उपसा कोणाच्या आशीर्वादाने चालु आहे हे एक मोठे कोडे आहे.

           महसुल विभागाने प्रामाणिक प्रयत्न करुन ही वाळू ,मुरूम चोरी रोखणे आवश्यक आहे. परंतु सदर विभाग डोळ्यावर कातडे ओढून बघ्याची भूमिका घेत आहे.  दिवसाढवळ्या होणारी वाळू मुरूम व माती चोरी महसुल कर्मचाऱ्यांना समजत नाही हे मोठे दुदैव आहे. पर्यावरणाचा ऱ्हास  थांबविण्यासाठी   उपसा, वाळू मुरूम, माती याचे उत्खनन हे दिवसाढवळ्या होत असूनही महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News