ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी समता परिषदेच्या वतीने जळगावात बैठक संपन्न


ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी समता परिषदेच्या वतीने जळगावात बैठक संपन्न

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :--अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जळगाव जिल्ह्याच्या वतीने ओबीसी आरक्षण वाचविण्या संदर्भात आज दिनांक 15 रोजी दुपारी बारा वाजता पद्मालय विश्रामगृह जळगाव याठिकाणी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली विविध ओबीसी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार, तसेच माजी खासदार समीर भुजबळ समता परिषदेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, संपर्क प्रमुख अनिल नळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी आरक्षण वाचविण्यात संदर्भात येणाऱ्या काळात जिल्हा व तालुका स्तरावर मोर्चे काढून जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देणे, वेळोवेळी धरणे, आंदोलन यांचे नियोजन करणे यासंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी ओबीसींच्या  आरक्षणाला धक्का न लावता  शासनाने  मराठा समाजाला आरक्षण द्यावे  मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत  समता परिषदेचा व कोणत्याही ओबीसी संघटनांचा विरोध नसून  फक्त शासनाने  ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे  यासंदर्भात विचार विनिमय करण्यात आला. तसेच समता परिषद जिल्हाध्यक्ष सतीश महाजन सर यांनी सर्व तालुकाध्यक्ष यांनी तालुकास्तरावर विविध ओबीसी संघटनांच्या प्रमुख यांना भेटून बैठकीचे आयोजन करून प्रत्येकाला याबाबतीत जागृत करावे याबाबत आवाहन केले तसेच माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर खानदेश माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश महाजन समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतीश महाजन जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील यांनी मार्गदर्शन केले बैठकीला जळगाव महानगर महिला अध्यक्षा भारती काळे साहस फौंडेशनच्या अध्यक्षा सरिता कोल्ले समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस भगवान महाजन चाळीसगाव तालुका अध्यक्ष कैलास जाधव भडगाव तालुका अध्यक्ष भानुदास महाजन पारोळा तालुका अध्यक्ष संतोष महाजन धरणगाव तालुका अध्यक्ष पारोळा तालुका सरचिटणीस धिरज महाजन धनराज माळी जिल्हा संघटक विठ्ठल माऊली ज्येष्ठ सदस्य व नशिराबादचे माजी पंचायत समिती सदस्य जनार्दन माळी सत्यशोधक विचार मंच चाळीसगाव तालुका अध्यक्ष भगवान रोकडे निलेश देवरे राजेंद्र महाजन ज्येष्ठ  समता सैनिक भगवान महाजन प्रमोद घुगे विकास महाजन व विविध संघटनांचे पदाधिकारी व समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्याध्यक्ष वसंत पाटील यांनी केले तर तालुकाध्यक्ष संतोष महाजन यांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News