चांदेकसारेत रेणुकाताई कोल्हे यांचे उपस्थितीत रांगोळी स्पर्धा बक्षिस वितरण संपन्न !!


चांदेकसारेत रेणुकाताई कोल्हे यांचे उपस्थितीत रांगोळी स्पर्धा बक्षिस वितरण संपन्न !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

आज दि .१५नोव्हेंबर रोजी चांदेकसारे येथे साई आधार बहुउद्देशिय संस्थे मार्फत दिपावली निमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत्या त्या स्पर्धचे बक्षिस वितरण समारंभ सौ.रेणुकाताई कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी सौ.मोनिकाताई संधान यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक केशवराव होन,सरपंच पुनम खरात,उपसरपंच व संस्थेचे अध्यक्ष श्री विजय होन उपस्थित होते. 

स्पर्धतील विजेत्या गावातील १२ मुली व महिलांना १० ग्रामचे चांदीचे नाणे,प्रमाणपत्र व पैठणी साडी सौ रेणुकाताई व सौ मोनिकाताई यांच्या हस्ते देण्यात आले. या रांगोळी स्पर्धला महीलावर्गाने भरभरून प्रतिसाद दिला गावातील१०५ मुली तसेच महिलांनी स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता.

चांदेकसारे येथील साई आधार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक केशवराव होन यांचा संकल्पनेतुन व संस्थेचे अध्यक्ष विजय होन यांचा प्रयत्नातुन दिपावलीच्या शुभमुहुर्तावर घर तिथे रांगोळी सधचे आयोजन करण्यात आले होते.

 माजी सरपंच केशवरावजी होन यांचा मार्गदर्शनाखाली चांदेक सारे गावात सामाजिक,शैक्षणिक तसेच सांस्कृतीक उपक्रम सुरू असतात त्यांस ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद मिळतो.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News