साईबाबांच्या भक्तांसाठी शिर्डी सज्ज, मंदिर प्रशासनात सहकार्याचे आश्वासन, खा. लोखंडे बैठकीला उपस्थितीत


साईबाबांच्या भक्तांसाठी शिर्डी सज्ज,    मंदिर प्रशासनात सहकार्याचे आश्वासन, खा. लोखंडे बैठकीला उपस्थितीत

शिर्डी- राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषनेनंतर आज पाडव्याच्या मुहूर्तावर साईबाबा मंदिर भक्तांसाठी खुले केले जाणार आहे. कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून काही नियामवली तयार करण्यात आली आहे. संबधित नियम पाळण्यासाठी व भक्तांना कोणत्याही असुविधा होऊ नये म्हणून शिर्डी ग्रामस्थांकडून सर्वोतपरी सहकार्य केले जाणार आहे. कोरोनामुळे मंदिर गेली नऊ महिन्यांपासून बंद आहे. त्याचा परिणाम शिर्डीच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. काल राज्य शासनाकडून मंदिरे खुली करण्याचे जेव्हा घोषणा झाली तेव्हा त्याचे स्वागत शिर्डीत फटाके फोडून करण्यात आले. मंदिर खुले करण्याचे स्वागत करत शिर्डी ग्रामस्थांनी नगरपालिका कार्यालयात अगोदर बैठकी घेतली. त्यानंतर मंदिर प्रशासनाबरोबर बैठक घेऊन प्रशासनाला सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. या बैठकीला ग्रामस्थांबरोबर खासदार सदाशिव लोखंडेही उपस्थितीत होते.


दररोज एक हजार ग्रामस्थांना दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी मंदिर प्रशासनाकडून टोकण पद्धत वापरली जाणार आहे. तसेच प्रत्येक आरतीला अगोदर येणाऱ्या दहा ग्रामस्थांना उपस्थितीत राहाता येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांची थोडी गैरसोय होणार असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी कोरोनाच्या काळात सहकार्य करण्याचे अवहान साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी केले आहे. तसेच साईबाबा समाधी मंदिराबरोबर शिर्डीतील इतरही मंदिरही दर्शनासाठी खुले केले जाणार असल्याचे बगाटे यांनी सांगितले. या बैठकीला नगराध्यक्षा श्रीमती आर्चनाताई कोते, शिवसेना नेते कमलाकर कोते, कैलासबापू कोते, अभय शेळके, राजेंद्र गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, मंगेश त्रिभुवन, सचिन कोते, विजय जगताप, गजानन शेर्वेकर, जगन्नाथ गोंदकर, रविंद्र गोंदकर, दत्तात्रय गोंदकर, सचिन शिंदे, साईराज कोते, सुजित गोंदकर, अशोक गोंदकर, नितिन कोते यांच्यासह प्रशासनाचे उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, प्रांतधिकारी गोविंद शिंदे, शिर्डी नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकार काकासाहेब डोईफोडे आदी उपस्थितीत होते.

साईबाबा भक्तांना त्रास होता कामा नये- ग्रामस्थ व संस्थान प्रशासन यामध्ये समन्वयाची भूमीका पार पडणार असून साईबाबा भक्तांना त्रास देणाऱ्या समाज कंटकाना कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार- खासदार सदाशिव लोखंडे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News