शेतकऱ्यांच्या दारी वृक्षारोपण करून दिवाळी साजरी...अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम


शेतकऱ्यांच्या दारी वृक्षारोपण करून दिवाळी साजरी...अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम

श्रीगोंदा प्रतिनिधी (अंकुश तुपे) : दिवाळी म्हटले कि मिठाई वाटप फटाक्यांची आतषबाजी करणे परंतु अग्नीपंख फौंडेशनने लोणीव्यंकनाथ येथे वृक्ष कांन्तीचे जनक ए एस नाथन यांचे हस्ते शेतकरी कुंटुबांत फणसाचे वृक्षारोपण करून वृक्षाबरोबर दिवाळीचा आनंद लुटला वृक्ष कांन्तीचे जनक ए एस नाथन दिवाळीचा उत्सव साजरा करण्यासाठी आले होते त्यांनी परिसरातील विविध झाडांची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या घरोघर जाऊन वृक्षारोपण केले

वृक्षारोपण करण्यासाठी वृक्षामित्र बाळासाहेब जठार गंगाराम काकडे ऋतुक जगताप  अजय खलाटे डॉ चेतन काकडे राजवर्धन काकडे मनोज निंबाळकर वाल्मीक खलाटे यांनी विषेश मदत केली . डॉ ए एस नाथन म्हणाले अग्नीपंख फौंडेशन गेल्या दोन दिवसांपासून दिवाळी निमित्ताने वृक्षारोपणाचा उपक्रम निसर्ग संवर्धन करण्याच्या दृष्टीने चांगले काम करीत आहे 

झाड हीच ईश्वराचे रुप असुन प्रत्येकाने झाड हे आपल्या कुंटुबांतील सदस्य आहे असे समजून वृक्षारोपण व संवर्धन करणे आवश्यक आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News