पंडित नेहरु यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेसच्यावतीने अभिवादन!! तत्कालीन काँग्रेसने समर्थन नाकारले होते - अनिल परदेशी


पंडित नेहरु यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेसच्यावतीने अभिवादन!! तत्कालीन काँग्रेसने समर्थन नाकारले होते - अनिल परदेशी

पंडित नेहरु यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेस आयोजित कार्यक्रमप्रसंगी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते अनिल परदेशी, शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, भिंगार अध्यक्ष आर.आर.पिल्ले, रुपसिंग कदम, फिरोज शफी खान, रुपसिंग कदम, जरिना पठाण आदि.

नगर (प्रतिनिधी संजय सावंत= -) इंदिराजींच्या पडत्या काळात तत्कालीन काँग्रेस नेते इंदिराजींना समर्थ कनण्यास राजी नव्हते. 1977 च्या पराभवनानंतर इंदिराजींच्या पाठिशी सामन्य कार्यकर्ते खंबीरपणे होते. त्यामुळे त्यांना नजिकच्या 1979 च्या मध्यवर्ती निवडणुकीत यश मिळाले होते. बदलत्या काळात मात्र सामान्य, निष्ठावाण आणि ध्येयवादींना बाजूला सारुन सामाजिक कार्य नव्हे तर राजकारणाला महत्व प्राप्त झाले ही परिस्थिती बदलण्यासाठी 1977-78 प्रमाणे सामान्यांची एकजूट करण्याची गरज आहे, त्यादृष्टीने आपण प्रयत्न करावे, असे आवाहन ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते अनिल परदेशी यांनी केले.

    पंडित नेहरु यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेस आयोजित कार्यक्रमात श्री.परदेशी अध्यक्ष म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, जवाहरलाल नेहरुंचे योगदान मोठे आहे. त्यांच्यानंतर इंदिराजींनी देशाला खंबीर नेतृत्व दिले. आज देशाला ही अशा नेतृत्वाची गरज असून, यासाठी सामान्यांची एकजूट होणे गरजेचे आहे.यावेळी इंटकचे हनिफ शेख, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, ज्येष्ठ सदस्या जरिणा पठाण, आदिंनी समयोचित भाषणे केली. स्वागत भिंगार अध्यक्ष अ‍ॅड.आर.आर.पिल्ले यांनी केले तर प्रास्तविक शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले.

   प्रारंभी पंडित नेहरु यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. शहर सरचिटणीस अभिजित कांबळे, उपाध्यक्ष अरुण धामणे, आर.आर.पाटील, माजी पोलिस निरिक्षक व उपाध्यक्ष एम.आय.शेख, महिला प्रदेश सदस्य शारदा वाघमारे, रजनी ताठे, मीना धाडगे, निजाम पठाण, अ‍ॅड.नरेंद्र भिंगारदिवे, विवेक येवले, विजय आहेर, बाळासाहेब ठोंबरे, संतोष कांबळे, सुभाष रणदिवे आदि यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेश सटाणकर यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News