शिर्डी, राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी, अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी ता.कर्जत येथील बौध्द समाजातील तरूण समाधान रमेश शिंदे याच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे केली आहे.
टॅक्टर चोरीच्या संशयावरून समाधान शिंदे याला अंदाजे 10 /12 लोकांनी राशीन व अंबालिका साखर कारखाना या ठिकाणी अमानुषपणे मारहाण केली होती. या प्रकरणात टॅक्टर मालक गणेश नारायण मोरे ,त्याचा मित्र धनंजय बबन गुंड, व नाना ज्ञानदेव सुद्रीक या तिघांवर कर्जत पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अद्यापही एकाही आरोपीला अटक न झाल्याने संतप्त नागरिकांनी कोपर्डीत बेमुदत आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. यात आणखी आरोपी असण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची सीआयडी चौकशी करा. व फिर्यादी बाळासाहेब शिंदे आणी घटनेतील साक्षीदार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे असे उत्तरेश्वर कांबळे म्हणाले.