सुरेश बागल दौंड प्रतिनिधी: भारतीय सम्राट अशोक मोर्य स्मारक कृती समिती सिध्दार्थ नगर दौंड यांच्या वतीनेकोविड योध्दा सन्मानपत्र वाटत दौंडचे पत्रकार राजेंद्र सोनवलकर यांना कोविड (१९) योद्धा सन्मानपत्र समितीचे संस्थापक अध्यक्ष मनोज भाऊ गायकवाड, संस्थापक उपाध्यक्ष संजय चितारे (नगरसेवक) सचिवसचिन भाऊ खरात, मा. नगरसेवक रमेश तांबे, शंकर बनसोडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.
याअगोदर राजेंद्र सोनवलकर यांना आदर्श निर्भीड पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार, रक्तदाता पुरस्कार, राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, कोरोना योद्धा पुरस्कार आदि पुरस्कार त्यांना या आदि प्राप्त झालेले आहेत. या कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालय, विद्युत महामंडळ, दौंड पोलिस स्टेशन, दौंड नगरपालिका, आरोग्य विभाग, पत्रकार वर्ग, अंगणवाडी सेविका, डॉक्टर्स, तहसीलदार, सामाजिक, राजकीय व धार्मिक कोरोना काळात कार्य करणाऱ्या व्यक्तींना कोविड (१९ )कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती हॉल या ठिकाणी घेण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय थोरात, प्रमोद थोरात, गौतम गायकवाड, श्रीकांत थोरात, शशांक गायकवाड, विजय शिंदे, शेरखान पठाण, कपिल रणदिवे, आदिसह समितीचे कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.