सामाजिक बांधिलकी जपत एका शिक्षकाने केले 35 वेळा रक्तदान,जोपर्यंत रक्तदान देता येईल तोपर्यंत देत राहणार


सामाजिक बांधिलकी जपत एका शिक्षकाने केले 35 वेळा रक्तदान,जोपर्यंत रक्तदान देता येईल तोपर्यंत देत राहणार

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

-- सामाजिक कार्याचे विविध पैलू आहेत,समाजासाठी कोण कसे योगदान देईल सांगता येत नाही, अशाच एका शिक्षकाने सामाजिक बांधिलकी जपत 35 वेळा रक्तदान केले आहे, नागेश विलास होलम असे या शिक्षकाचे नाव आहे, काशी विश्वनाथ माध्यमिक विद्यालय या ठिकाणी ज्ञान दानाचे कार्य केले आहे, ते करत असताना रक्तदानाचे महान कार्य करीत आहे, दौंड येथील रहिवाशी असलेले होलम सर यांनी त्यांच्या वयापेक्षा जास्त वेळा रक्तदान केले आहे, पुणे येथे 7 वेळा,निमगाव खलू याठिकाणी महापुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी 12 वेळा रक्तदान केले आहे, दौंड येथे 9,अहमदनगर 3,श्रीगोंदा येथे 4 वेळा रक्तदान केले आहे,काल निमगाव खलू येथील मित्राच्या नातेवाईकाला रक्ताची गरज होती त्यावेळी त्यांनी लगेच दौंड सरपंच वस्ती येथील रोटरी ब्लड बँकेत येऊन रक्तदान केले,आणि विशेष म्हणजे त्यांचा रक्तगट 0 निगेटिव्ह आहे,की कोणालाही देता येतो, त्यांना गोपाळवाडी गावचे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष विठ्ठल होले यांच्या हस्ते सर्टिफिकेट देण्यात आले,यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले,रोटरी ब्लड बँकेचे नारायण सर,अनिल बारगळ सोसायटी चेअरमन,निलेश बारगळ ग्रामपंचायत सदस्य,सामाजिक कार्यकर्ते आबा डोंगरे,प्रथमेश काकडे उपस्थित होते, हे कार्य असेच पुढे सुरू राहणार असून जोपर्यंत मला रक्तदान करता येईल तोपर्यंत मी देत राहणार असा मानस होलम सर यांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News