पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची DYSP राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली दबंग कारवाई,9 बोटी केल्या उध्वस्त,सहा जणांविरोधात गुन्हा दाखल


पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची DYSP राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली दबंग कारवाई,9 बोटी केल्या उध्वस्त,सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

- दौंड -पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दौंड पोलीस स्टेशनला चार्ज घेतानाच गुन्हेगारी मोडीत काढणार असल्याचे संकेत दिले होते, त्याची प्रचिती येऊ लागली आहे,दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे,वडगाव दरेकर,पेडगाव हद्दीत भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना मिळाली होती,त्यानुसार पो हवा असिफ शेख,पो हवा पांडूरंग थोरात,पोलीस नाईक आण्णासाहेब देशमुख,पो कॉन्स्टेबल अमोल गवळी,किरण राऊत,अमोल देवकाते,रवि काळे,किशोर वाघ,चालक पोलीस नाईक शैलेश रणसिंग तसेच 6 होमगार्ड यांचे एक पथक तयार करून सदरील गावामध्ये रात्री 11 वाजता जाऊन पहाणी केली असता त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याचे दिसून आले, त्यानंतर तेथीलच एक  छोटी बोट घेऊन पोलिसांनी नदी पात्रात जाऊन कारवाई सुरू केली याची चाहूल उपसा करणाऱ्या लोकांना लागताच त्यांनी पळून जाण्यास सुरवात केली त्यावेळी पो नि नारायण पवार यांनी दोन तीन पोलिसांसह मोठी फायबर पकडली आणि तीन चार किलोमीटर पर्यंत पळून चाललेल्या बोटी पकडून प्रत्येक बोटीत एक एक पोलीस बसवून वडगाव दरेकर हद्दीतएका जागेवर आणल्या,व महसूल विभागाच्या मदतीने 6 फायबर बोट व तीन सेक्शन बोटी जिलेटिनच्या साह्याने ब्लास्टिंग करून उध्वस्त केल्या आहेत,ही कारवाई रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत म्हणजे अविरत 13 तास सुरू होती यामध्ये 1 कोटी 20 लाखाचा मुद्देमाल नष्ट केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे,त्यावरील लोक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले, ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख,दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केली असून 6 जणांविरोधात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये 1)अनिल पोपट गिरमकर राहणार आर्वी, तालुका श्रीगोंदा,जिल्हा अहमदनगर,2)दादा झुंबर गिरमकर राहणार आर्वी,3)बबलू पांडूरंग इफते राहणार देऊळगाव राजे,तालुका दौंड जिल्हा पुणे,4)दिपक सुरेश माने राहणार वडगाव दरेकर,5)महेश उर्फ पप्पू हनुमंत कोथिंबीरे राहणार नवनाथ नगर तालुका श्रीगोंदा,6)गणेश मोहन शेजळ राहणार वडगाव दरेकर यांचे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News