प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने इंदापूर तहसील कार्यालय येथे विविध मागण्या साठी आंदोलन .


प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने इंदापूर तहसील कार्यालय येथे विविध मागण्या साठी आंदोलन .

श्री . काकासाहेब मांढरे इंदापूर  ( दि. १२ नोव्हेंबर ) :

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी होत नसले यांना या योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी दिनांक १२ / ११ / २०२० गुरुवार रोजी तहसीलदार इंदापूर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आली.

केंद्र व राज्य सरकारच्या योजना असून अधिकारी यांच्या मनमानी कारभार मनमानी कारभारामुळे उदासीनतेमुळे दिव्यांगांना हक्कापासून योजना पासून वंचित राहावे लागत आहे हे शासन नियमानुसार शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष साध्या विभाग क अपंग २०१५ प्र . क्र .५५ / अ. क्र .२, दि .१८ नोव्हेंबर २०१८स्वराज्य संस्थांचा पाच टक्के निधी नियंत्रण व खर्च करण्यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार सचिव सदस्य असल्याने समिती गठित करण्यात यावी इंदापूर तालुक्यातील पाच टक्के ग्रामपंचायत निधी खर्च न करणाऱ्या ग्रामपंचायत वर कारवाई करण्यात यावी, संजय गांधी पेन्शन ही वयाची अट न लावता सर्वसामान्य सरसकट अपंगांना मिळावी, जिल्हा निर्वाहभत्ता वाटप करावे शासन नियमानुसार सरसकट अपंगाना अंत्योदय योजनेचा अन्नधान्याचा लाभ मिळावा अपंगांना विभक्त रेशन कार्ड देण्यात यावे, ५ %  गाळे विना  नीलावी वितरण करण्यात यावे पंचायत समिती व तहसील कार्यालयावर अपंगासाठी स्वतंत्र कक्ष देण्यात यावा तालुकास्तरावर अपंग भवन करण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले व मागण्याचे निवेदन तहसीलदार सौ . सोनाली मेटकरी यांचेकडे देण्यात आले. यावेळी संघटनेचे घनश्याम सातव, महिला अध्यक्षा सौ सुरेखा ढवळे, सुभाष दिवेकर व अनेक अंपग बांधवांनी यात भाग घेतला व  घोषणा दिल्या  त्यामुळे काही काळ वातावरण तापले होते शेवटी पोलीस बंदोबस्त बोलावण्यात आला दरम्यान चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News