वाहनांना रिफ्लेक्स्टर बसविणे व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न


वाहनांना रिफ्लेक्स्टर बसविणे व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

श्री . काकासाहेब मांढरे इंदापूर  ( दि.१३ नोव्हेंबर ) :

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना व महामार्ग पोलीस मदत केंद्र इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाहनचालकांचे आरोग्य तपासणी शिबिर व वाहतूक नियमांचे प्रबोधन रिफ्लेक्टर बसवण्याचा कार्यक्रम  कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे माजी सहकारमंत्री, कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर महामार्ग पोलिस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक शंकर मुटेकर, इंदापूर पोलीस ठाण्याचे जाधव तसेच कारखाना संचालक मंडळ उपस्थित होते. 

यावेळी उपस्थित वाहन चालकांना मार्गदर्शन करताना चेअरमन हर्षवर्धन पाटील म्हणाले की,यंदा कारखान्याकडून  चारशे ट्रॅक्टर वाहने, चारशे ते पाचशे बैलगाडी,सहा ते सात हार्वेस्टर यांच्या माध्यमातून रोज प्रतिदिनी दहा हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे नियोजन करण्यात येत आहे. ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांचे अपघात टाळण्यासाठी वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, वाहनचालकांनी वाहन चालविताना योग्य ती खबरदारी घेवून, वाहतुक नियमांचे उल्लंघन न करता ऊस वाहतुक करावी. अश्या सूचना त्यांनी यावेळी चालकांना दिल्या. 

सध्या तालुक्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चालकांच्या, कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने कारखान्याने कार्यस्थळावरच आरोग्य तपासणीची सोय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याठिकाणी कोरोना संशयीत रुग्णांची तपासणी, विलगीकरणाची, उपचाराची सोय करण्यात आल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

महामार्ग वाहतूक पोलिस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक शंकर मुटेकर म्हणाले की, वाहन सुरक्षा संदर्भात वाहन चालक मालक यांना पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे. ऊस वाहतुक करताना रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी.रात्रीच्या वेळी ऊस वाहतुक होत असते. त्यामुळे वाहनांना कारखान्याच्या नावाचे कापडी रिफ्लेक्टर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे होणारे अपघात टाळले जातील. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.शक्यतो डाव्या बाजूने ऊस वाहतुकीचे वाहने चालवावित, व्यसन टाळावे.असे त्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले तर सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी केले, आभार  कारखान्याचे संचालक प्रशांत सूर्यवंशी यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News