गावठी रिवाल्वर विक्री करणे पडले माघात दोघे जन शिक्रापूर पोलीसांच्या जाळ्यात


गावठी रिवाल्वर विक्री करणे पडले माघात  दोघे जन शिक्रापूर पोलीसांच्या जाळ्यात

बेकायदा हत्यार जवळ बाळगणार्याची गय केली जाणार नाही- तावसकर

शिरूर । प्रतिनिधी ( अप्पासाहेब ढवळे) शिक्रापूर पोलीस स्टेशनचे हद्दीत नितीन जाधव व किरण कोळी हे दोघे जन गावठी रिवाल्वर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलीसांना मळताच  दोन तरुणांना शिक्रापूर पोलीसांनी गावठी रिवाल्वरसह चाकण चौक (शिक्रापूर) येथे सापळा रचून मोठ्या शिताफिने ताब्यात घेऊन त्यांच्या विरुध्द त्यांच्यावर हत्यार बाळगणे व हत्यार कयदा कलम १(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास स्वतः करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली 

         पोलीस सुत्राकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी कि शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या पथकाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख,बारामती विभागाचे मिलिंद मोहिते,दौंड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर,पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी,पो.ना अमोल दांडगे,पो.ना.योगेश नागरगोजे,पो.कॉ मिलिंद देवरे,पो.कॉ.किशोर शिवणकर,पो.कॉ.लक्ष्मण शेरकर या पथकाने आरोपी नितीन सुधार जाधव (वय २५ रा. भांडेगाव,तालुका बार्शी,जिल्हा सोलापूर)व किरण भरत कोळी (वय २४ राहणार भांबर्डे रोड रांजणगाव,तालुका शिरूर मुळगाव गोरधावले,तालुका चोपडा,जिल्हा जळगाव)या दोघे जन शिक्रापूर चाकण चौक येथे हे गावठी रिवाल्वर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच या दोघांना फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सापळा रचून मोठ्या शिताफिने ताब्यात घेऊन त्यांच्या विरुध्द त्यांच्यावर हत्यार बाळगणे व हत्यार कयदा कलम १(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली.

        शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा हत्यार जवळ बाळगणार्याची गय केली जाणार नाही जर असे कोणीही बेकायदेशीरीत्या हत्यार जवळ बाळगत असेल तर ती माहिती नागरिकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा माहिती देणार्या सदर नागरिकाचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन  शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी केले.

                         

जाहिरात
Search
विडिओ
Recent News