जमीन आरोग्य पत्रिका नुसार शेतकऱ्यांनी खत व्यवस्थापन करावे !! कृषी अधिकारी


जमीन आरोग्य पत्रिका नुसार शेतकऱ्यांनी खत व्यवस्थापन करावे !! कृषी अधिकारी

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी. 

दि १३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने मौजे कुंभारी येथील शिवाजीनगर मध्ये जमीन आरोग्य पत्रिका मार्गदर्शन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले यावेळी माननीय अशोकराव आढाव तालुका कृषी अधिकारी अविनाश चंदन मंडल कृषी अधिकारी कोळपेवाडी चंद्रकांत डांरागे आत्माचे शैलेश आहेर कृषी सहाय्यक निलेश बिबवे कंपनीचे एचडी प्रभाकर सुंदरराव कदम दिपकराव ठाणगे मंगेश  बढे अण्णासाहेब बढे मच्छिंद्र कदम प्रभाकर  कदम उपसरपंच दिगंबरराव बढे सरपंच प्रशांत घुले आदि उपस्थित होते ,

 यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना श्री अशोक राव आढाव यांनी जमीन आरोग्य पत्रिकेचे महत्त्व तसेच माती परीक्षणाच्या माध्यमातून आपल्याला संतुलित खताचा वापर करणे शक्य होते तसेच शेतकऱ्यांनी वेळेवर खत व्यवस्थापन केल्यास उत्पादनात वाढ होते त्याचबरोबर पिकाची निरीक्षणे आपण योग्य पद्धतीने घेतल्यास रोग व्यवस्थापन वरील खर्च कमी करता येतो तसेच यावेळी तयार झालेले सोयाबीनचे उत्पादनातुन  पुढील वर्षासाठी बियाणी ठेवावे व कांदा उत्पादन तंत्रज्ञान मधील विविध बाबींमध्ये विश्लेषण करताना खत व्यवस्थापन सविस्तरपणे शेतकऱ्यांना माहिती दिली.

 या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना बिजप्रक्रिया चे महत्त्व मंडळ अधिकारी श्री चंदन अविनाश यांनी समजावून सांगितले या प्रशिक्षणाच्या वेळी सॅनि टायझर चा वापर व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्यात आले सदर प्रशिक्षणास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला शेवटी कृषी सहाय्यक निलेश बिबवे यांनी आभारप्रदर्शन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News