पर्यावरण संवर्धन व कोरोना मुक्तीचा संदेश देत निमगाव वाघात धनत्रयोदशी साजरी


पर्यावरण संवर्धन व कोरोना मुक्तीचा संदेश देत निमगाव वाघात धनत्रयोदशी साजरी

युवक व ग्रामस्थांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ ग्रामस्थांना आर्सेनिक गोळ्यांचे वाटप करुन कोरोनामुक्तीसाठी मार्गदर्शन 

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) पर्यावरण संवर्धन व कोरोना मुक्तीचा संदेश देत धनत्रयोदशी निमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व विश्‍वंभरा प्रतिष्ठानच्या सहकार्याने गावातील युवक व ग्रामस्थांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्यात आली. तर गावातील नवनाथ मंदिराच्या सभा मंडपात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ग्रामस्थांना आर्सेनिक गोळ्यांचे वाटप करुन कोरोनामुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. 

या कार्यक्रमाप्रसंगी नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, डॉ. महेश मुळे, डॉ. विजय जाधव, माजी सरपंच साहेबराव बोडखे, अनिल डोंगरे, बापू फलके, जालिंदर आतकर, अरुण कापसे, पिंटू जाधव, भाऊसाहेब जाधव, रामेश्‍वर चेमटे, सतीश ढाकणे, तुकाराम खळदकर, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, मेजर बाळू भुसारे, शिवाजी पुंड, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, प्रियंका डोंगरे, दिपक जाधव, सचिन जाधव, शब्बीर शेख, मयुर काळे, बाबासाहेब काळे, अशोक कापसे, राजू गुंजाळ, बाबासाहेब चारुडे, लहानू जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. पै. नाना डोंगरे म्हणाले की, कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना या दिवाळीत फटाक्यांच्या प्रदुषणामुळे आनखी धोका वाढण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेऊन गावात वायू व ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. प्रदुषणाला आळा घालण्यासाठी व पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करण्याची गरज आहे. ध्वनी, वायू प्रदुषणामुळे आरोग्यावर व पर्यावरणावर दुष्परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. किसन वाबळे यांनी दिवाळी हा अंधकार दूर करणारा सन आहे. समाजात पर्यावरणाचा समतोल ढासळला असून, हा अंधकार जागृकतेने दूर होणार असल्याची भावना व्यक्त केली. 

डॉ. महेश मुळे यांनी आरोग्याच्या दृष्टीकोनाने जागृकता निर्माण होण्याची गरज आहे. कोरोनाला न घाबरता त्याचे संक्रमण रोखण्यासाठी पुरेपुर उपाययोजना आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक गोळ्या उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगून, कोरोनापासून बचाव करण्यासाठी आयुर्वेदाचा आधार घेण्याचे आवाहन करुन त्यांनी मार्गदर्शन केले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News