कर्जत नगरपंचायतच्या प्रभाग पाच मधुन निवडणूक लढविणार - बबन (भाऊ) नेवसे


कर्जत नगरपंचायतच्या प्रभाग पाच मधुन निवडणूक लढविणार - बबन (भाऊ) नेवसे

मोतीराम शिंदे कर्जत प्रतिनिधी - कर्जत नगरपंचायतची निवडणूक जाहीर झालेली असून दोन दिवसांपूर्वीच प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आलेले असून आता निवडणूक लढण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांची जोरात तयारी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. कर्जत नगरपंचायतचा नवीन निघालेला प्रभाग क्रमांक पाच मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी ग्रामपंचायत सदस्य बबन नेवसे हे विद्यमान प्रभाग क्रमांक पाच या प्रभागात नागरीकांचा मागास प्रवर्ग आरक्षण निघाले असल्यामुळे या प्रभागातून राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी करणार असल्याची माहिती  बबन नेवसे यांनी दिली. नेवसे यांनी पूर्वी ग्रामपंचायत असताना याच प्रभागातून २००० ते २००५ या सालात ग्रामपंचायत सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केलेले असल्यामुळे या प्रभागातील जनतेचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळणार आहे. तसेच  २००५ सालच्या ग्रामपंचायत मध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत अवघ्या अकरा मतांनी पराभव झाला होता. परंतु आता कर्जत नगर पंचायतची निवडणूक जाहीर झाली असून  प्रभाग क्रमांक पाच मधे नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण निघाले असल्यामुळे या प्रभागातील जनतेच्या मागणीनुसार नेवसे हे उमेदवारी करणार आहेत. बबन नेवसे हे पुर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सक्रिय कार्यकर्ते असून नेवसे यांनी राष्ट्रवादीचे कर्जत शहराध्यक्ष म्हणून आठ वर्ष काम पाहिलेले आहे. त्यामुळे  राष्ट्रवादीचे तिकीट मलाच मिळणार असून मी निवडणूक लढवणार आहे.  नेवसे हे अत्यंत मनमिळाऊ व शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा व शासन दरबारी कामे करून घेण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक पाच मधुन मी नक्की विजयी होणार अशी भावना नेवसे यांनी व्यक्त केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News