दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना पुन्हा सक्रिय, दुसरी लाट येण्याचे संकेत,ग्रामस्थांनी नियमाचे पालन करा--डॉ शिवराणी पांचाळ


दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना पुन्हा सक्रिय, दुसरी लाट येण्याचे संकेत,ग्रामस्थांनी नियमाचे पालन करा--डॉ शिवराणी पांचाळ

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

वरवंड -- कोरोना महामारीचे संकट अजून संपलेले नाही,परंतू जनता मात्र बिनधास्त झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे, शासन,प्रशासन,पोलीस यांनी जोपर्यंत कडक पकडले होते तोपर्यंत सर्व काही आलबेल होते,लोक आता मास्क फक्त कान आणि हनुवटीला लावण्यासाठी ठेवत आहेत ही चिंतेची बाब आहे, कोरोना पळाला आता आम्हाला काही होत नाही, अशी भावना लोकांनी करून घेतली आहे, परंतू डॉक्टरस थंडीच्या कडक्यामुळे आणि लोकांच्या बेजबाबदार पणामुळे  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त करत आहेत, दौंड तालुक्यात सध्या तीच परस्थिती उदभवली आहे,गेल्या एक महिन्यापासून कोरोनाच्या पेशन्ट मध्ये कमी आली होती,परंतू कोरोना पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे,दौंड शहरात दोन दिवसात तीन रुग्ण सापडले आहेत,तर दौंड तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत, वरवंड येथील दिनांक 11/11/20 रोजी 10 व्यक्तींचे घस्यातील द्रव तपासण्यात आले होते त्यापैकी 7 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये बेटवाडी येथील पाच आणि रोटी येथील दोन जण असल्याचे डॉ शिवानी पांचाळ यांनी सांगितले आहे, तर 12/11/20 रोजी 5 व्यक्तींचे स्वाब तपासण्यात आले होते त्यापैकी वरवंड येथील  1 जण पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले,यावरून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे संकेतच यानिमित्ताने मिळत आहेत. यावेळी डॉ शिवराणी पांचाळ यांनी जनतेला शासनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे, लोकांनी दिवाळी साजरी करताना गर्दी करू नये, फटाके वाजवू नये,रुग्ण तसेच वयस्कर व्यक्ती यांना त्रास होऊ शकतो,त्यासाठी सर्वानी काळजी घेणे आवश्यक आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News