फुले वाडा येथे अभिनेत्री मेघना झुझम यांच्या उपस्थित दीपोत्सव उत्साहात साजरा,


फुले वाडा येथे अभिनेत्री मेघना झुझम यांच्या उपस्थित  दीपोत्सव उत्साहात साजरा,

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

पुणे उद्योग परिषद जानेवारी 21 मध्ये फुलेवाड्यावरच  होणार --बापूसाहेब मेहेर 

प्रतिनिधी --पुणे येथील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संपूर्ण वाड्या मध्ये अभिनेत्री मेघना झुंझम व इतर मान्यवरांच्या  हस्ते दिपोत्सव साजरा करण्यात आल्याचे बापूसाहेब मेहेर यांनी सांगितले, यावेळी महात्मा फुले आदर्श उद्योजक म्हणून पहिली उद्योग परिषद पुणे येथून फुलेवाड्यावरुनच शुभारंभ करून राज्याला दिशा देणार अशी घोषणा बापूसाहेब मेहेर अध्यक्ष महात्मा फुले बिझनेस क्लब यानी केली आहे.

हे आपले ऊर्जा केंद्र असून उद्योग क्षेत्रातील आदर्श सर्वाच्यासमोर आहे म्हणून अनुकरणीय असेल भाजपा व्यापारी सेल पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकासदादा जगताप म्हणाले फुले दांपत्याचे महान कार्य असून सामाजिक,शेक्षणिक उद्योग शेती अशा विविध पातळीवर उत्तम कार्य असून आजही उपयुक्त आहे तेव्हा त्यांचे कार्याचा वारसा आपन जपून पुढे घेऊन जाणे ही काळाची गरज आहे

अभिनेत्री मेघना झुझम म्हणाल्या दिपावलीचा पहिला दिवा लावून त्यांच्या कार्याची ज्योत पेटविली ती सर्वत्र दरवळत राहो व समाज सुजलाम सुफलाम घडो अशा सदिच्छा व्यक्त केल्या,दशरथ कुळधरण यानी स्वागत करून प्रस्तविक केलेत सुनंदा डेरे यानी आभार मानले सर्व सावित्रीच्या लेकी व पुरुष मंडळी नी ज्योत लावून फुले दाम्पत्यांच्या विचारांची शिदोरी पुढे घेऊन जाण्याचा मानस यावेळी व्यक्त केला,या कार्यक्रमाला अभिनेत्री मेघना, बापूसाहेब मेहेर, विकासदादा जगताप, किरण दुगाने, पोपटराव बोराटे, सुनंदा डेरे, शांता नेवसे व दशरथ कुळधरण यांचा सत्कार करण्यात आला, बाळासाहेब मेहेत्रे इतर मान्यवर  व सावित्री च्या लेकी उपस्थित होत्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News