भोजडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे वाल्मिक सिनगर बिनविरोध !!


भोजडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी  काळे गटाचे वाल्मिक सिनगर बिनविरोध !!

भोजडे ग्रामपंचायती उपसरपंचपदी वाल्मिक शंकर सिनगर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना आमदार आशुतोष काळे, समवेत राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,दतात्रय सिनगर आदि.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीय दृष्टया अतिशय महत्वाच्या असणाऱ्या भोजडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे वाल्मिक शंकर सिनगर यांची बिनविरोध निवड झाली  असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संग्राम बोर्डे  यांनी दिली आहे.

भोजडे ग्रामपंचायती उपसरपंच यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी निवडणूक नुकतीच सरपंच सौ. रतनबाई दत्तात्रय सिनगर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी उपसरपंच पदासाठी काळे गटाचे वाल्मिक शंकर सिनगर यांचा उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत असलेले ग्रामविकास अधिकारी संग्राम बोर्डे यांनी वाल्मिक शंकर सिनगर यांची उपसरपंच म्हणून निवड जाहीर केली. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजीराव ठाकरे, दत्तात्रय सिनगर, दत्तात्रय घनघाव, अनिल धट, किरण आहेर, विक्रम सिनगर, पवन सिनगर, रंगनाथ सिनगर, संतोष सिनगर, फारुख पटेल, बाळासाहेब मंचरे, धोंडीराम धट, संजय सिनगर, मिथुन गायकवाड आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.                       

नवनिर्वाचित उपसरपंच वाल्मिक सिनगर यांचे माजी आमदार अशोकराव काळे, कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल वाल्मिक शंकर सिनगर यांनी सर्व सदस्यांचे भार मानले असून भोजडेच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच व सर्व सदस्यांना सोबत घेवून आमदार आशुतोष काळे यांनी आपल्यावर विश्वासाने टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडू अशी ग्वाही दिली.

उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित  उपसरपंच वाल्मिक सिनगर यांनी आमदार आशुतोष काळे यांची त्यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेवून आभार मानले. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी उपसरपंच वाल्मिक सिनगर यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


                             

जाहिरात
Search
विडिओ
Recent News