कर्जत नगरपंचायतच्या वतीने महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून साड्यांची दिवाळी भेट


कर्जत नगरपंचायतच्या वतीने महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून साड्यांची दिवाळी भेट

 कर्जत प्रतिनिधी - (मोतीराम शिंदे कर्जत) - कर्जत नगर पंचायतीच्या वतीने सर्व स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व भाऊबीज म्हणून उच्च प्रतीच्या पैठणी साड्यांचे वितरण आज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत व  मुख्याधिकारी गोविंदराव जाधव यांच्या हस्ते सर्व स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांना या साड्यांचे वाटप करण्यात आले. या साड्या वाटपाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक दत्तात्रय सोलंकर उपस्थित होते. नगरसेविका सौ. उषा राऊत, अनिल गदादे, तसेच कार्यालय प्रमुख संतोष समुद्र, बापूसाहेब उकिरडे, साठे साहेब व नगरपंचायत चे सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महिला स्वच्छता कर्मचारी म्हणून एकुण 26 महिला आहेत. या सर्वाना उच्च प्रतीच्या साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना नामदेव राऊत म्हणाले की दरवर्षीच्या रीतीरिवाजाप्रमाणे कर्जत शहरातील स्वच्छता करणाऱ्या महिलांना मकर संक्रातीला व वर्षातील सर्वात मोठा सन असलेल्या दिवाळीच्या सणाला साड्यांचे वाटप करण्यात येत असते. त्यामुळे याही वर्षी साडी भेट देण्यात आल्याचे राऊत म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरपंचायतचे कर्मचारी बापूसाहेब  उकिरडे यांनी केले.   

                                   नगर पंचायतची निवडणूक तोंडावर असल्यामुळे यावर्षी महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना उच्च प्रतीच्या साड्यांचे वाटप करण्यात आल्याने महिलांचा आनंद  ओसंडून वाहताना दिसत होता.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News