सौ.चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून डिजिटल दिवाळी व गड किल्ले बांधणी स्पर्धा !!


सौ.चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून डिजिटल दिवाळी व गड किल्ले बांधणी स्पर्धा !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी. 

 कोपरगाव -डिजिटल नवरात्र उत्सवाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर दरवर्षीप्रमाणे नागरिकांना दिवाळीचा आनंद साजरा करता यावा यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून व आमदार आशुतोषदादा काळे फौंडेशन यांच्या वतीने डिजिटल दिवाळी, पहाट पाडवा कार्यक्रम व शिववैभव ईको फ्रेंडली (पर्यावरण पूरक) गड किल्ले बांधणी स्पर्धा व आयोजित करण्यात आली आहे.

       संपूर्ण विश्व कोरोना संकटाशी लढत आहे. त्यामुळे दरवर्षी पारंपारिक पद्धतीने साजरे होणारे सण साजरे करतांना नागरिकांना मर्यादा येत आहे. त्यामुळे सर्वात मोठा असणारा दिवाळीचा सण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी बसूनच साजरा करतांना नागरिकांचा उत्साह कमी होऊ नये यासाठी डिजिटल दिवाळी, पहाट पाडवा व शिववैभव ईको फ्रेंडली (पर्यावरण पूरक) किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामागे दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्याबरोबरच रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गड किल्ल्यांच्या बळावर बलाढ्य शत्रूला नामोहरम केले त्या गड किल्ल्यांची ओळख भाविपिढीला व्हावी,आपल्या शूर वीरांच्या पराक्रमाची महती ज्ञात व्हावी हा देखील उद्देश या गडकिल्ले बांधणी स्पर्धेचा असल्याचे सौ.चैतालीताई काळे यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आमदार आशुतोष काळे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून नागरिकांना पाहता येणार आहे.

                       आपले गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्याचे प्रतिक असून या प्रत्येक किल्ल्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. तसेच हे गडकिल्ले आपल्या राज्याची ओळख देखील आहे. आपली संस्कृती व आपली परंपरा आपण जपलीच पाहिजे. त्यासाठी आपल्या परंपरा व आपल्या राज्याचे भूषण असलेल्या गडकिल्ल्यांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी गडकिल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धकांना या स्पर्धेमध्ये घरात बसूनच सहभागी होता येणार असून विजेत्या स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहे. त्या स्पर्धेचा निकाल सोमवार (दि.१६) रोजी सायंकाळी ७.०० वा.जाहीर करण्यात येणार आहे. पहाट पाडवा कार्यक्रम यापूर्वी दरवर्षी होत होता मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे हा कार्यक्रम होणार नाही. त्यामुळे कोपरगावातीलच कलाकारांच्या कलाकृतीतून पहाट पाडवा कार्यक्रम साकारला आहे. हा दिवाळी पहाट पाडवा कार्यक्रम हा सोमवार (दि.१६) रोजी सकाळी ७.०० वा. आमदार आशुतोष काळे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर नागरिकांना पाहता येणार आहे. अशा आगळ्यावेगळ्या डिजिटल दिवाळी, पहाट पाडवा कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच शिववैभव ईको फ्रेंडली (पर्यावरण पूरक) गड किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन घरात बसूनच आपला दिवाळीचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन सौ.चैतालीताई काळे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News