अंधकारमय जीवनाला प्रकाश देण्याचे फिनिक्स फाऊंडेशनचे कार्य प्रेरणादायी - अक्षय कर्डिले


अंधकारमय जीवनाला प्रकाश देण्याचे फिनिक्स फाऊंडेशनचे कार्य प्रेरणादायी - अक्षय कर्डिले

फिनिक्स फाऊंडेशनच्यावतीने नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटनप्रसंगी युवा नेते अक्षय कर्डिले. समवेत  आनंद छाजेड, रामलाल पटवा, जालिंदर बोरुडे, हनिफ शेख, बाबासाहेब धीवर, अविनाश देडगांवकर आदी.

नगर - (प्रतिनिधी संजय सावंत) आज दिपावलीचा सण कोरोनाच्या सावटाखाली सर्वत्र साजरा होत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून सुरु झालेल्या महामारीने आरोग्यबाबतची जागरुकता आधोरिखित केली आहे. त्यामुळे सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती बनली आहे. फिनिक्स फाऊंडेशनने या कोरोना काळातही नेत्र शिबीराच्या माध्यमातून गरजू- गरीबांच्या अंधकारमय जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. या कार्यातून समाजातील अंधांना दृष्टी मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा उपक्रमामुळे समाजातील दु:ख कमी होण्यास मदत होणार आहे. अशा उपक्रमांची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले. 

फिनिक्स फाऊंडेशनच्यावतीने नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चाईल्ड लाईनचे हनिफ शेख, आनंदऋषीजी नेत्रालयाचे आनंद छाजेड, रामलाल पटवा, फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, बाबासाहेब धीवर, अविनाश देडगांवकर आदी उपस्थित होते. हनिफ शेख म्हणाले, शासनाच्यावतीने 6 ते 18 वर्षे वयोगटातील अनाथ मुला-मुलींसाठी संपूर्ण शिक्षण, निवास व इतरही सर्व जबाबदारी शासनाच्यावतीने घेण्यात येणार आहे. समाजातील अनाथ मुला-मुलींना याचा लाभ मिळवून देण्यासाठी सामाजिक संघटना, संस्थांनी पुढे यावे. याबाबत समाज कल्याण विभागाची संपर्क साधावा. फिनिक्स फाऊंडेशनच्या आरोग्य सेवेने अनेकांच्या जीवनात हास्य फुलविण्याचे काम केले आहे. नेत्रशिबीराच्या माध्यमातून गरजूंना होणारा लाभ व त्यांच्या चेहर्यांवरील आनंद हीच त्यांच्या कामाची पावती आहे.

याप्रसंगी जालिंदर बोरुडे म्हणाले, फिनिक्स फौंडशनच्यावतीने कोरोना काळातही शिबीरात खंड पडू न देता रुग्णसेवेचे व्रत सुरु ठेवले आहे. समाजातील गोर-गरिबांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी फौंडेशनचे कार्य करत आहे. अंधांना हा प्रकाशाचा उत्सव पाहता यावा यासाठी दिपावलीनिमित्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेतले आहे. या शिबीराच्या माध्यमातून अंधांना पुन्हा मिळालेली दृष्टी हेच मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. 

या शिबीरात आनंदऋषीजी नेत्रालयाच्यावतीने 368 रुग्णांची तपासणी करण्यात आली तर मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 74 रुग्णांची निवड करण्यात आली. तर 23 रुग्णांना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी फिनिक्स फौंडेशनचे रोहन धाडगे, सौरभ बोरुडे, अक्षय धाडगे, गौरव बोरुडे आदिंसह पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News