मार्केट यार्ड च्या दारात प्रायव्हेट चारचाकी वाहनांची अनधिकृत पार्किंग गाळेधारकांना व्यवसाय होईना रोजचा त्रास शेवगांवच्या चालक मालक संघटनेचे नगरपरिषद च्या मुख्याधिकाऱ्यांकडे पार्किंग च्या जागेसाठी मागणी


मार्केट यार्ड च्या दारात प्रायव्हेट चारचाकी  वाहनांची अनधिकृत पार्किंग गाळेधारकांना व्यवसाय होईना रोजचा त्रास शेवगांवच्या चालक मालक संघटनेचे नगरपरिषद च्या मुख्याधिकाऱ्यांकडे पार्किंग च्या जागेसाठी मागणी

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगांव शहरातील आणि तालुक्यातील सुमरे शंभर च्या वर खासगी प्रवासी वाहने पूर्वी आंबेडकर चौकात आणि आता मार्केटच्या दुकानासमोर पार्किंग करत आसल्याने  परिसरातील दुकानदारांची आणि त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची चांगलीच पंचायत झाली आहे त्यात चालक मालक संघटनेच्या वाहनांना शहरात पार्किंग साठी जागाच नसल्याने व व्यापारी हि रस्त्यावर वाहने उभी राहु  देत नसल्याने जर भाडे नसेल तर ही  वाहने दिवसभर पार्किंग करायची कुठे असा गंभीर प्रश्न चालक मालक संघटनेसमोर पडला आहे त्यांनी एक निवेदन तयार करून शेवगांव नगरपरिषद कडे एक सुरक्षित वाहन तळ  या सर्व चारचाकी पार्किंग साठी पालिकेच्या मालकीच्या जागेवर व  सर्वांच्या सोयीचे असावे या साठी निवेदन दिले आहे मागील आठवड्यात या वरून चालक आणि दुकानदार यांच्यात हमरी  तुमरीचा प्रसंग झाला होता परंतु राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यापारी आणि चालक यांना सामंजस्याची भूमिका घ्यायची विनंती केल्याने वाद तात्पुरता मिटला परंत्तू जोपर्यंत या सर्व खासगी वाहनना अधिकृत वाहनतळ पालिका उपलब्ध करून देत  नाही तो पर्यंत या कुरबरी सुरुच  राहणार आहेत शहरात एकही अधिकृत वाहनतळ नाही याचा त्रास संपूर्ण शहरातील बाजारपेठेला होत असतो शेवगांव चे वाहतूक पोलीस सुध्दा याकडे बघ्याच्या भूमिकेत असतात याकडे कोण गांभीर्याने पाहणार ???

जाहिरात
Search
विडिओ
Recent News