नामदेवराव देसाई स्मरणात राहणारे व्यक्तिमत्व!! बिपीन दादा कोल्हे.


नामदेवराव देसाई स्मरणात राहणारे व्यक्तिमत्व!! बिपीन दादा कोल्हे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी   

    काही माणसे आपल्या आयुष्याचा कितीही संघर्ष व संकटाचा काळ असला तरी स्मरणात राहतात, त्यात ज्येष्ठ साहित्यिक नामदेवराव देसाई या व्यक्तिमत्त्वाचे नाव आवर्जून घ्यावेसे वाटते असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक नामदेवराव देसाई  यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळानिमित्त सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.   अध्यक्षस्थानी माजी मंत्री शंकरराव कोल्हे होते.

            प्रारंभी साखर सर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी प्रास्तविक केले.स्नेहवर्धन प्रकाशन श्रीरामपूर यांनी देसाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा  नामानिराळा गौरव ग्रंथ प्रकाशित केला त्याची प्रत श्री. कोल्हे यांना यावेळी देण्यात आली.याप्रसंगी प्रभारी कार्यकारी संचालक राजेंद्र सूर्यवंशी, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, रमेश जगताप, नितीन देसाई यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी संचालक आदी उपस्थित होते.

       श्री. बिपिन दादा कोल्हे पुढे म्हणाले की, त्यांच्या नावात देव आणि संत साई दोघे आहेत, त्यामुळेच नामदेवराव देसाई 81 व्या वर्षातही मनाने आणि देहाने तरुण आहेत.आज आयुष्यात प्रत्येकाला अश्रू आहेत, पण हसवणे अत्यंत अवघड आहे, हसण्याची कला त्यांना अवगत आहे,ती त्यांनी लेखणीतून उतरवत साऱ्यांना खळखळून हसवत ठेवले आहे.त्यांच्या कार्यकर्तृत्वाची भरारी घेणारा नामानिराळा गौरवग्रंथ सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.सत्कारास उत्तर देताना नामदेवराव देसाई म्हणाले की,सहकाराच वैभव वाढवून अहमदनगर जिल्ह्याला समृद्ध करण्यासाठी अनेक मातब्ब्बरांनी काम केले,त्यात शंकरराव कोल्हे यांचे नाव शिरोभागी असून संजीवनी उद्योग समूहाने केलेल्या सत्कार आपल्या नेहमीच स्मरणात राहील.

       कोपरगाव जेष्ठ साहित्यिक नामदेवराव देसाई यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने बिपिनदादा कोल्हे यांनी सत्कार केला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News