स्थानिक व्यावसायिकांच्या हित जोपासण्यासाठी सौ.चैतालीताई काळेंची कोपरगावच्या बाजारपेठेत खरेदी !!


स्थानिक व्यावसायिकांच्या हित जोपासण्यासाठी  सौ.चैतालीताई काळेंची कोपरगावच्या बाजारपेठेत खरेदी !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 मागील आठ महिन्यापासून संपूर्ण विश्वावर कोरोना विषाणूचे संकट होते.त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसाय बंद होते. मागील चार महिन्यांपासून हे व्यवसाय जरी सुरु झाले असले तरी कोरोना संकटामुळे नागरिक बाहेर पडत नसल्यामुळे या व्यवसायात जम बसण्यास वेळ लागणार आहे. त्याबरोबर ऑनलाईन खरेदीमुळे देखील स्थानिक व्यावसायिकांच्या चिंता वाढल्या होत्या. स्थानिक बाजारपेठेतच खरेदी करावी याबाबत सामाजिक व्यक्तींकडून सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती देखील सुरु आहे. याबाबत कोपरगाव आमदार आशुतोष काळे यांनी देखील नागरिकांनी स्थानिक बाजारपेठेत दिवाळीची खरेदी करावी असे आवाहन केले होते.  त्या आवाहनाला  जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी प्रतिसाद देवून व प्रत्यक्ष कृती करून स्थानिक व्यावसायिकांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी कोपरगावच्या बाजारपेठेत सर्वसामान्य व्यावसायिकांकडून दिवाळीची खरेदी करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काही महिने लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्व व्यवसाय बंद होते व नागरिकांना देखील बाहेर पडण्यास मनाई होती. त्यामुळे नागरिकांना सर्व सण उत्सव कोरोनाच्या सावटाखाली आपल्या घरात बसून साजरे करावे लागले. मात्र जून महिन्यापासून अनलॉक सुरु करण्यात आल्यामुळे हळूहळू घालण्यात आलेली बंधने शिथिल करून व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोरोना संकट तेव्हाही होते व आजही आहे मात्र तीव्रता काहीअंशी कमी झाली आहे. अशातच तोंडावर आलेल्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी सर्व नागरिकांची लगबग सुरु असून काही नागरिक कोपरगाव तालुक्याच्या बाहेर जावून खरेदी करीत आहे तर काही ऑनलाईन खरेदी करीत आहे त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे.

याबाबत स्थानिक नागरिकांनी आपल्या गावातच खरेदी करावी व स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायाला बळकटी मिळावी हा संदेश कोपरगावच्या बाहेर जावून खरेदी करणाऱ्या व ऑनलाईन खरेदी करणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी सौ.चैतालीताई काळे यांनी बुधवार (दि.११) रोजी दुपारी चिरंजीव आयांशसह सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे कोपरगावच्या बाजारपेठेत दिवाळीसाठी आवश्यक असलेली खरेदी केली. खरेदी करतांना व्यावसायिकांशी व्यवसायाबाबत सखोल चौकशी करून व्यवसायाच्या अडचणी जाणून घेतल्या. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या महिलांची देखील त्यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या, रांगोळी, आकाश कंदील,करदोटे असे अनेक साहित्य खरेदी केले. तसेच हे साहित्य घेतांना पर्यावरणाचे हित जोपासण्यासाठी घेतेलेले साहित्य कॅरी बॅगमध्ये न घेता कागदात घेतले.मी आपल्या कोपरगावच्या बाजारपेठेत खरेदी केली त्याप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी देखील आपल्या तालुक्यात आपल्या गावातील स्थानिक बाजारपेठेतच दिवाळीची खरेदी करून स्थानिक व्यावसायिकांचे व्यवसाय वाढीसाठी हातभार लावावा असे आवाहन सौ. चैतालीताई काळे यांनी केले आहे.

- स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायाला बळकटी देण्यासाठी कोपरगावच्या बाजारपेठेत खरेदी करतांना जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News