शहरात कुंटनखान्यावर छापा.. महिलेसह युवकावर पोलिसांची कारवाई


शहरात कुंटनखान्यावर छापा.. महिलेसह युवकावर पोलिसांची कारवाई

श्रीगोंदा प्रतिनिधी (अंकुश तुपे):

शहरात स्टेशन रोडवर घरात चालू असलेल्या एका कुंटनखान्यावर श्रीगोंदा पोलिसांनी छापा करून, एका युवकासह ४८ वर्षीय महिलेवर कारवाई केली आहे. आज दिनांक ११ नोव्हेंबर रोजी ५:३० च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.स्वताचे आर्थिक फायदयाकरीता कुंटनखाना चालवुन संगनमत करुन, त्यावर मिळणारे पैशावर आपली उपजिवीका भागवुन, पिडीत महिलांना अवैध वेश्या व्यवसाय करण्यासाठी त्यांना कुटुंनखान्यामध्ये अडकवुन, वेश्या गमनाकरीता प्रवृत्त करुन, अवैध रित्या कुंटनखाना चालविताना त्यासाठी लागणारे साहित्य कंडोम, निरोध, रोख रक्कम २५०० रुपये व मोबाईल इत्यादी किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याचे पोलिसांनी   फिर्यादीतदाखल केले आहे.महिला पोलीस शिपाई ने दिलेल्या फिर्यादीवरुन अरुण देवकर राहणार बाबुर्डी रोड सह एका महिलेवर भा.द.वि. ३७०(३) सह स्त्रियांचे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हा पोलीस हे. कॉ. आर.बी.झुंजार यांनी दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News