दौंड रिलायन्स पेट्रोल पंपावर 1 लाखाची चोरी चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद,सुदैवाने 2 लाख वाचले


दौंड रिलायन्स पेट्रोल पंपावर 1 लाखाची चोरी चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद,सुदैवाने 2 लाख वाचले

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी: दौंड येथील रिलायन्स पेट्रोल पंपावर दिवसा ढवळ्या दुचाकी गाडीला लावलेली पिशवी अज्ञात चोरट्याने चोरल्याचे ठाणे अंमलदार श्रावण गुपचे यांनी सांगितले, सदर चोरी बाबत राजेंद्र हरिभाऊ थोरात वय 52 व्यवसाय शेती राहणार कौठा तालुका श्रीगोंदा हे सकाळी दौंड येथील बँकेत आले होते त्यांनी तेथून तीन लाख रुपये रक्कम काढून घेतले व त्यातील 2 लाख रुपये त्यांच्या ओळखीचे काका पाटोळे यांना दिले,आणि पुढे रिलायन्स पंपावर डिझेल घेण्यासाठी आले असता दुचाकी उभा करून पाणी पिण्यासाठी गेले असता तेथेच उभा असलेल्या अज्ञात तरुणाने 1 लाख रुपये असलेली पिशवी चोरून नेली, अशी फिर्याद दौंड पोलीस स्टेशन दिली आहे,दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पो हवा तन्वीर सय्यद,पोलीस कॉन्स्टेबल रवि काळे,अमोल देवकाते,किरण डुके,राऊत यानी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता  सदरचा सर्व प्रकार पंपावरील CCTV कॅमेऱ्यात आला  असल्याचे दिसले,त्यानुसार पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून कॉल देऊन सदर घटनेची माहिती दिली, कॅमेऱ्यामध्ये अंदाजे 22 वर्ष वयाचा अज्ञात तरुण सदर 1 लाख रुपये असलेली पिशवी घेऊन पळून जाताना दिसत आहे,सुदैवाने 2 लाख रुपये अगोदरच दिल्या मुळे त्यांचे मोठे नुकसान वाचले आहे, राजेंद्र थोरात यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तरुणाच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो हवा तन्वीर सय्यद पुढील तपास करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News