शेवगांव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा पगार थकला जबाबदार कोण ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांवर शिमगा करायची वेळ आणली कोणी कर्मचार्याच्या लेकरांचा तळतळाट घेतंय कोण???
शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण शेवगांव नगरपरिषदेच्या गेल्या तीन महिन्यांचा पगार बोनस आणि ऍडव्हान्स पोटी थकीत रक्कम त्वरित सर्व कामगारांच्या खात्यात वर्ग करावी म्हणुन गेल्या तीन दिवसांपासून नगरपरिषदेच्या कार्यालयाबाहेर सर्व कामगार धरणे आंदोलन करत आहे* आज क्रांती चौकात रस्ता रोको सुध्दा करण्यात आला उद्या तालुक्याच्या आमदार मोनिका ताई राजळे यांच्या शेवगांव मधील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे *या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी शेवगांव भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सह अनेक सामाजिक संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला* परंतु शेवगांव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना *ऎन सणासुदीच्या काळात काम बंद आंदोलन करण्याची पाळी येते याला जबाबदार कोण निष्क्रिय अधिकारी की बेजबाबदार पदाधिकारी* तुटपुंज्या पगारावर जोखमीची काम करणारी कर्मचारी *कोरोना काळात आणि संपूर्ण लोकडाऊन मध्ये बिनपगारी आन फुल अधिकारी होऊन आपला जीव धोक्यात घालुन काम करत होते* माजी आमदार चंद्रशेखर घुले आमदार असताना व *पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता असताना कधीही कर्मचाऱ्यांवर अशी ऎन सणासुदीत कामबंद व धरणं आंदोलन करण्याची वेळ आली नव्हती* या सर्वांचा परिणाम सर्व सत्ताधाऱ्याना येऊ घातलेल्या नगरपरिषद च्या निवडणुकीत किंमत मोजावी लागेल असे दिसते
*पालिकेकडे कोट्यवधींचे टेंडर ची बिले काढण्यासाठी पैसे आहे ठेकेदार आणि कमिशन घेणारे साहेब लोक तुपाशी आणि पालिकेचे कर्मचारी आणि शहरातील जनता उपाशी* अशी अवस्था झाली आहे