कोपरगांव औद्योगिक वसाहतमधील विज पुरवठा सुरळीत झाल्याशिवाय बिले भरणार नाही !!


कोपरगांव औद्योगिक वसाहतमधील विज पुरवठा सुरळीत झाल्याशिवाय बिले भरणार नाही !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

                   महावितरण कार्यालय समोर वसाहतमधील कारखानदारांचे ठिय्या आंदोलन !!

कोपरगांव औद्योगिक वसाहतमधील वारंवार खंडीत होणा-या विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा वारंवार कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीकडे सतत पाठपुरावा करुन देखील दखल न घेतल्यामुळे वसाहतमधील कारखानदारांनी विदयुत वितरण कंपनी कार्यालय समोर ठिय्या अंदोलन करुन विदयुत पुरवठा सुरळीत होईपर्यंत कारखानदार कोणतेही विज बिले भरणार नसल्याचे जाहिर केले.  

 जगासह, देशभरात थैमान घातलेल्या कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्रातही लाॅकडाउन करण्यात आले होते. मार्च महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या लाॅकडाउन मुळे दळणवळण पुर्णपणे थांबलेले होते. या कालावधीत कोपरगांव औद्योगिक वसाहत मधील सर्व कारखाने बंद असल्याने कारखानदारांचे मोठे नुकसान झाले त्यातच कान्हेगांव, वारी, सवंत्सर,कोकमठाण या गावासह इतर काही भागातील गावे कोपरगांव औद्योगिक सहकारी वसाहतीचे सबस्टेषनची 33 के.व्ही. लाईन ला जोडलेली असल्याने वसाहतीमधील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे उद्योजकांचे मोठे नुकसान झाले. वारंवार होणा-या खंडीत विजपुरवठामुळे कारखानदारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. औद्योगिक वसाहतील विद्युत पुरवठा सूरळीत होण्यासाठी स्वतंत्र फिडर बसविल्यास कारखानदारांना अखंडीत विद्युत पुरवठा होंण्यास मदत होईल त्याचबरोबर कारखानदारांना नेहमीच होणारा आर्थीक भुर्दंड सोसावा लागणार नाही. स्वतंत्र फिडर बसविण्यासाठी वसाहतमधील कारखानदारांनी वसाहतीचे चेअरमन विवेक बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालय समोर ठिय्या अंदोलन केले. जो पर्यंत वितरण कंपनी वसाहतमधील विदयुत पुरवठा सुरळीत करत नाही तो पर्यंत वसाहतमधील 200 कारखानदार कुठेलही विज बिले भरणार नसल्याचे कारखानदारांनी सांगितले. वसाहतमधील विदयुत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगवान खराटे यांनी कारखानदारांना लेखी आश्वासन दिल्या नंतरच अंदोलन थांबविण्यात आले. यावेळी वसाहतीचे व्हा. चेअरमन मनिष ठोळे, पराग संधान, केशवराव भवर, रोहित वाघ, निलेश वाके, अभिजीत रहातेकर, नरेंद्र कुर्लेकर, भरत शिंगी , जनार्दन वाके, कान्हाभाई रावलिया, देवीप्रसाद मिश्रा, रविंद्र शिंदे, चाचा चैधरी, मंगेश सरोदे, ज्ञानेश्वर नाईकवाडे, साईप्रसाद कदम, पप्पु वाडेकर इतर कारखानदार उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News