कोपरगाव तालुक्यासाठी १३३३ घरकुल मंजूर !!- सभापती सौ.पोर्णिमा जगधने


कोपरगाव तालुक्यासाठी १३३३ घरकुल मंजूर !!- सभापती सौ.पोर्णिमा जगधने

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यासाठी १३३३ घरकुल मंजूर झाले असल्याची माहिती सभापती सौ. सौ. पोर्णिमा जगधने यांनी दिली आहे.

आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती-जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मागील चार वर्षात कोट्यावधी रुपयांचे विकासकामे झाली आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्वच सदस्यांच्या पाठपुराव्यातून विविध ठिकाणी बंधारे, पिण्याच्या पाण्याच्या विविध योजना, रस्ते, शाळा खोल्या, संरक्षक भिंती आदी विकासकामे पूर्ण झाली आहेत.अनेक कामे सुरु आहेत तर  काही कामे पूर्णत्वाकडे जात असून शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचला आहे. त्याप्रमाणेच गरजू लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी देखील केलेल्या पाठपुराव्यातून खुल्या वर्गासाठी ११०७, अनुसूचित जाती २३ व जमातीसाठी २०३ असे एकूण १३३३ घरकुल मंजूर झाले आहेत.

                 घरकुल वाटपाच्या योजनेचे काम सुरु झाले आहेत.ग्रामपंचायतीकडून गरजू लाभार्थ्यांची माहिती घेतली जावून कागदपत्रांची तपासणी करण्यात येवून पात्र लाभार्थ्यांना घरकुल दिले जाणार आहे. मागील काही वर्षापासून घरकुल योजनेसाठी पात्र असूनदेखील स्वत:ची जागा नसल्यामुळे गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नव्हता. ज्या गावात घरकुल मंजूर आहेत त्याच गावांत घरकुल बांधणे शासन नियमानुसार बंधनकारक आहे. लाभार्थी कुटुंबांना घरकुलासाठी आवश्यक असणारी जागा त्या-त्या गावातच खरेदी करायचे ठरविले तरी त्या जागेची गावांतर्गत खरेदी होत नव्हती. त्यामुळे घरकुलाचा लाभ मिळून देखील हे गरजू लाभार्थी कुटुंब घरकुल बांधण्यापासून वंचित राहून त्यांच्या घरकुलाचा निधी शासनाकडे परत जात होता. त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी लक्ष घालून अशा गरजू कुटुंबांना शासन निर्णयानुसार गावांतर्गत जागा खरेदी करण्यासाठी परवानगी द्यावी अशा सूचना केल्या होत्या त्या सूचनांप्रमाणे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी ज्या कुटुंबांना घरकुल मंजूर आहे परंतु स्वतःची जागा नाही त्या कुटुंबांसाठी गावांतर्गत एक ते अडीच गुंठ्यांची खरेदीची परवानगी दिली आहे त्यामुळे वंचित असणाऱ्या अनेक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे सभापती सौ. पोर्णिमा जगधने यांनी म्हटले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News