[ चार तासात ७८ युवकांनी केले रक्तदान ]
सचिन पवार सुपे प्रतिनिधी /
कोरोना आजाराने साऱ्या जगात थैमान घातला असुन याचा वाढत्या प्रमाणाने शासकीय रूग्णालयासह अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे , या उद्देशाने बारामती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अनिल हिरवे मित्र परिवारामार्फत वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते ,यावेळी केवळ चार तासात सुमारे ७८ युवकांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले आले ,
जगभरासह संपुर्ण देशात कोविड १९ विषाणुने जणू एकप्रकारे युद्ध छेडण्यात आले आहे. या युद्धात सहभागी होताना तरूणांना प्रेरित करित असे सामाजिक कार्यकर्त अनिल हिरवे यांनी आपले सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे. त्यांच्या प्रेरणेने हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.पुणे येथील गरिब रूग्णांचे रूग्णालय समझले जाणारे ससुन हॉस्पिटल यांची शासकीय रक्तपेढी निमंत्रित करण्यात आली होती ,
या शिबिरात ७८ लोकांनी रक्तदान केले. सुमारे ७८ बाटल्या रक्तसंकलन झाले, या सामाजिक कार्याची धडपड आणि कोरोना काळातसुद्धा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.ससुन हॉस्पिटलच्या डॉ.देसले यांनी या उत्कृष्ट आयोजनाबद्दल अनिल हिरवे मित्र परिवार व राष्ट्रवादी युवक कॉग्रेस यांचे मनःपूर्वक आभार मानले व रक्तदात्याला देण्यान आलेल्या प्रमाणपत्राने दोन वर्षांसाठी ससुन सह शासकीय रूग्णालय ठिकाणी पुर्णपणे मोफत रक्त मिळणार असणारची माहिती दिली, कोरोनाला हरविणार असा निर्धार यावेळी तमाम रक्तदात्यांनी केला ,यावेळी कोरोना काळात सुपे गावात कोरोना योध्दाचे कार्य करणाऱ्या सुपे ग्रामपंचायत सफाई कर्मचारी , पोलीस अधिकारी , आरोग्य कर्मचारी यांचा कोरोना योध्दा म्हणुन पुणे राष्ट्रवादी पद्वीवीधर संघ प्रतिनिधी सुयश जगताप संकल्पनेने सन्मान करण्यात आला ,
यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष संभाजी होळकर यांनी सदर कार्याचे कौतुक करत अनिल हिरवे मित्र परिवार नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असुन या कार्याची दखल नक्कीच घेतली जाईल असे सुस्पष्ट भाष्य त्यांनी यावेळी केले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे , सुपे गावचा सरपंच स्वाती अनिल हिरवे ,राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अशोक लोणकर ,जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य मल्हारी खैरे , मुनीर डफेदार , अशोक सकट, गणेश जाधव , सदस्या सुमन जगताप , राजश्री धुमाळ ,रेखा चांदगुडे , मा .तंटामुक्ती अध्यक्ष अनिल हिरवे , समता परिषद तालुका अध्यक्ष सचिन भुजबळ, राष्ट्रवादी पदवीधर प्रतिनिधी सुयश जगताप, राष्ट्रवादी विद्यार्थी उपाध्यक्ष महेश चांदगुडे , राजकुमार लव्हे, महाराष्ट्र शासन प्राद्रेशिक रक्तपेढी ससुन पुणे सर्व स्टाप सह ग्रामस्थ मित्र परिवाराचे रक्तदान कार्यकर्त उपस्थित होते ,