कर्जत नगरपंचायतचे प्रभागानुसार आरक्षण जाहीर


कर्जत नगरपंचायतचे प्रभागानुसार आरक्षण जाहीर

मोतीराम शिंदे कर्जत प्रतिनिधी : कर्जत.. नगरपंचायतच्या विद्यमान सदस्यांची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत असल्याने कर्जत नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक २०२० चे प्रभाग निहाय आरक्षण आज दिनांक १० रोजी कर्जत नगरपंचायतच्या आवारात निवडणूक निर्णय अधिकारी व कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या वतीने चिठ्ठी पध्दतीने लहान मुलांच्या हस्ते प्रभाग निहाय आरक्षण काढण्यात आले. असून ते पुढीलप्रमाणे आहे आताच्या नवीन प्रभागानुसार प्रभाग क्रमांक १ हा गायकर वाडी निघाला असून हा प्रभाग ओबीसी महिलेसाठी निघाला आहे. प्रभाग क्रमांक २ जोगेश्वरवाडी हा सुद्धा ओबीसी महिलेसाठी  निघाला असून प्रभाग क्रमांक ३ ढेरे मळा हा ओबीसी महिलेसाठी  निघाला आहे. प्रभाग क्रमांक ४ माळेगल्ली येथे  सर्वसाधारण स्त्री या जागेसाठी आरक्षण निघाले आहे. प्रभाग क्रमांक ५ पोस्ट ऑफिस चा भाग  ओबीसी व्यक्ती यासाठी आहे. तर प्रभाग क्रमांक ६ यासीन नगर हा प्रभाग साधारण व्यक्तीसाठी  झाला आहे. प्रभाग क्रमांक ७ बुवासाहेब नगर साधारण व्यक्ती साठी निघाला आहे. तसेच प्रभाग क्रमांक ८ शाहूनगर हा सर्वसाधारण व्यक्तीसाठी तर प्रभाग ९ समर्थ नगर सर्वसाधारण स्त्री साठी, प्रभाग १० बेलेकर कॉलनी सर्वसाधारण स्त्री, प्रभाग ११ बरगेवाडी ओबीसी स्त्री, प्रभाग १२ शहाजी नगर सर्वसाधारण व्यक्तीसाठी, प्रभाग क्रमांक १३ गोदड महाराज  गल्ली सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग क्रमांक १४ सोनार गल्ली सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक १५ भवानीनगर  अनुसूचित जाती पुरुष, तर प्रभाग क्रमांक १६ अक्काबाई नगर अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असून प्रभाग क्रमांक १७ भांडेवाडी हा सर्वसाधारण स्त्री साठी या सोडतीमध्ये निघाला असून एकुण सतरा सदस्यांसाठी हे आरक्षण काढण्यात आले आहे. या सतरा सदस्यांपैकी दहा जागा या महिलांसाठी असून यात चार जागा ओबीसी महिलांसाठी आहेत. तर पाच जागा सर्वसाधारण महिलांसाठी निघाल्या असून एक जागा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी निघाली आहे. तर पाच जागा या सर्वसाधारण व्यक्तीसाठी काढण्यात आल्या आहेत तसेच एक जागा अनुसूचित जातीच्या पुरुषासाठी तर एक जागा  ओबीसी व्यक्तीसाठी जाहीर झाली आहे. या जाहीर झालेल्या प्रभाग निहाय    आरक्षणामध्ये विद्यमान नगरसेविका सौ. उषा अक्षय राऊत व नगरसेविका सौ. राणी अनिल गदादे यांचे विद्यमान मतदारसंघ हे अनुसूचित जातीसाठी राखीव निघाल्यामुळे या दोन नगरसेविकांची मोठी अडचण झाल्याचे दिसून येत असून त्यांना नवीन प्रभागात निवडणूक लढवावी लागेल.

आता होणारी नगरपंचायतची निवडणूक ही अत्यंत चुरशीची व स्थानिक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची होणार असुन या भागाचे आमदार रोहित पवार या निवडणुकीत काय करिष्मा दाखवणार की माजी मंत्री प्रा. राम शिंदे या निवडणुकीत काय भूमिका घेणार व कर्जत नगरपंचायतची सत्ता कोणाकडे जाणार याकडे सर्वाचे लक्ष लागणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News