बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी भोसले यांचा सत्कार


बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी भोसले यांचा सत्कार

महासंघाचे सामाजिक कार्य व बोरुडे यांच्या आरोग्य सेवेचे जिल्हाधिकारींकडून कौतुक

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने नुतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे स्वागत करुन महापुरुषांच्या जीवन चरित्रावरील पुस्तक भेट देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बोरुडे, उपाध्यक्ष निलेश उबाळे, सचिव इंजी. राजहंस देसाई, कार्याध्यक्ष रतन तुपविहिरे, अतुल थोरात, अनिल जाधव, संजय रायकवाड आदींसह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जालिंदर बोरुडे यांनी बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या कार्याची माहिती दिली. व्याख्याते गणेश शिंदे यांनी जालिंदर बोरुडे यांचे फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती करुन दिली. जिल्हाधिकारी भोसले यांनी महासंघाचे व बोरुडे यांचे आरोग्य क्षेत्रात चालू असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. तर सरकारी कर्मचारी असून देखील, कोणतीही मदत, अनुदानविना सुरु असलेल्या नेत्र व आरोग्य शिबीराची माहिती घेऊन पुढील सामाजिक कार्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News