शिर्डी साईबाबा संस्थानला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूंन प्रवीण गेडाम,तुकाराम मुंडें सारखे अधीकारी नेमावा


शिर्डी साईबाबा संस्थानला  मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूंन प्रवीण गेडाम,तुकाराम मुंडें सारखे अधीकारी नेमावा

शिर्डी ,राजेंद्र दूनबळे( प्रतिनिधी) शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची नुकतीच मुंबई येथे  अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली आहे ,आजच मंगळवारी हे बदलीचे आदेश निघाले आहेत, महाराष्ट्रात अनेक आयएएस व वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कान्हुराज बगाटे यांची बदली शिर्डीहून आता मुंबईला झाली आहे ,त्यांच्या जागेवर श्री साईबाबा  संस्थानच्या कार्यकारी अधिकारी म्हणून प्रवीण गेडाम किंवा तुकाराम मुंडे यांच्यासारखा अधिकारी असायला हवा व राज्य शासनाने अशा अधिकाऱ्यांची श्री साईबाबा संस्थान वर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करावी अशी मागणी आता साईभक्त व शिर्डीकर, नागरिक करीत आहेत, तशी मागणी  मुख्यमंत्र्याकडे करणार आहे, महाराष्ट्र राज्यातील अनेक आयएसआय व इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहेत या बदल्यांमध्ये शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांचीही बदली झाली आहे, श्री कान्हुराज बगाटे काही दिवसांपूर्वीच शिर्डीला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री साईबाबा संस्थान मध्ये रुजू झाले होते मात्र त्यांची  अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई येथे त्यांची आता बदली झाली आहे, बगाटे यांच्या जागेवर आता आयएएस अधिकारी असावा ,मात्र तोही ही चांगला व शिस्तप्रिय असा अधिकारी असावा त्यासाठी प्रवीण गेडाम किंवा तुकाराम मुंडे यांच्यासारखा अधिकारी श्री साईबाबा संस्थान वर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यावा अशी मागणी आता साईभक्ता कडून होत आहे, शिर्डी हे देशातील प्रसिद्ध असे देवस्थान आहे , साईबाबा मुळे अंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाले आहे, अशा या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्राच्या श्री साईबाबा संस्थान च्या कार्यकारी अधिकारीपदी चांगला व शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष अधिकारी असावा त्यासाठी प्रवीण गेडाम किंवा तुकाराम मुंडे यांच्यासारखे अधिकारी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यावेत अशी मागणी आता साईभक्तांनी केली आहे, त्यासाठी दैनिक साई दर्शनही त्याचा पाठपुरावा करणार आहे, नागरिकांनी त्यास सहकार्य करावे किंवा पाठिंबा द्यावा अशी मागणी आता होत आहे,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News