आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, शेवगाव येथे भारतरत्न डॉ. मौलाना अबुल कलाम आजाद यांची जयंती


आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, शेवगाव येथे भारतरत्न डॉ. मौलाना अबुल कलाम आजाद यांची जयंती

राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली....

 शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण :आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, शेवगाव येथे दि(११) रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यक्रमाचे संयोजक प्रा. सुधीर खिल्लारे यांनी केले. त्यानंतर महाविद्यालयाचे समन्वयक मा.श्री.शिवाजीराव लांडे यांच्या हस्ते भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्या प्रसंगी त्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

           कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोहिदास उदमल्ले यांनी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जीवनातील विविध अनुभव व आठवणी सांगून त्यांचे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून त्यांचे योगदान याविषयी सखोल विश्लेषण केले. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयातील  प्राध्यापक भगवान बारस्कर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. 

          या कार्यक्रमास आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र विद्यालयाचे प्राचार्य श्री.अरुण चोथे ,महाविद्यालयातील प्रा. प्रकाश गांगर्डे, डॉ. भाऊसाहेब देवकाते, प्रा.राम नेव्हल, प्रा.चेतन गर्जे, प्रा.भ ढ  स्मिता नाईक, ग्रंथपाल श्री. राजेंद्र काळे, प्रा. मनोज नरवडे तसेच, व कार्यालयीन कर्मचारी श्रीम. शोभा शिंदे, श्री.अविनाश दारकुंडे, श्री. रमेश खेडकर, श्री. दीपक पवार हे उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News