वेताळनगर (लिंगाळी) भागातील विजेच्या पोलची दुरुस्ती करावी:ग्राहक कल्याण फाऊंडेशन ची मागणी


वेताळनगर (लिंगाळी) भागातील विजेच्या पोलची दुरुस्ती करावी:ग्राहक कल्याण फाऊंडेशन ची मागणी

सुरेश बागल  दौंड प्रतिनिधी:

दौंड (वेताळनगर,लिंगाळी)येथील मोडकळीस आलेल्या वीजेच्या पोलची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्राहक कल्याण फाऊंडेशन ने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या दौंड यांच्याकडे केलेली आहे. दि.१०.६.२०२०रोजी ग्राहक कल्याण फाऊंडेशन ने पत्र व्यवहार केला होता की, मोडकळीस आलेल्या वीजेच्या पोलची दुरुस्ती करण्यात यावी .आज तागायत कुठल्याही प्रकारची दुरुस्ती झालेली नाही, तो पोल केव्हाही पडू शकतो , त्या पोलवर असंख्य कनेक्शन आहेत .लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा मानवी जीवितहानी होऊ शकते.दि.२८.१०.२०२० रोजी  विजेच्या पोलची  दुरुस्ती करण्यासाठी दुसरा पत्रव्यवहार झाला परंतू ,वीज वितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केले आहे. मानवी जीवितहानी झालेल्या घटनेला राज्य विद्युत वितरण कंपनी जबाबदार असेल.पत्रव्यवहार करताना यावेळी ग्राहक कल्‍याण फाउंडेशन  दौंड तालुका अध्यक्ष मा. श्री अनिल बापूराव नेवसे, सचिव दिगंबर अण्णा नेवसे, उपाध्यक्ष सविता ताई सोनवणे, अनिताताई लोंढे  सामाजिक कार्यकर्त्या, अध्यक्ष  राहुल पवार ग्राहक कल्याण फाउंडेशन बोरिपारधी इत्यादी .उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News