आदर्श नागरी पतसंस्थेच्या सभासदांना दिवाळी पार्श्वभूमीवर १२ टक्के लाभांश व कर्मचाऱ्यांना बोनस वाटप


आदर्श नागरी पतसंस्थेच्या सभासदांना दिवाळी पार्श्वभूमीवर १२ टक्के लाभांश  व कर्मचाऱ्यांना बोनस वाटप

विजय भोसले राहुरी फॅक्टरी प्रतिनिधी: पारदर्शक व विश्वासदर्शी कारभार करतानाच आदर्श नागरी पतसंसंस्थेने  सभासद,ग्राहक व कामगारांना नेहमी झुकते माफ दिले आहे.नावाप्रमाणे आदर्श पतसंस्था  आदर्श  काम करीत असल्याचे असल्याचे गौरवोदगार माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांनी काढले आहे. राहूरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्या सभासदांना दिवाळी पार्श्वभूमीवर १२ टक्के लाभांश  व कर्मचाऱ्यांना बोनस वाटप कार्यक्रम माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांच्या हस्ते संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेरणा उद्योग समूहाचे सुरेश वाबळे होते.तर व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन आण्णासाहेब चोथे,  संस्थेचे व्हाइस चेअरमन प्रा.सुधाकर कदम,डॉ.तनपुरे कारखान्याचे संचालक मच्छिंद्र तांबे, अशोक खुरुद, गायश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतीश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

 प्रारंभी स्वागत चेअरमन आण्णासाहेब चोथे यांनी केले तर प्रास्तविक व्हाइस चेअरमन सुधाकर कदम यांनी केले. पुढे बोलताना माजी खासदार प्रसाद तनपुरे म्हणाले की, नावातच आदर्श असलेल्या आदर्श पतसंस्थेने कायम पारदर्शकता ठेवल्याने चांगला नावलौकिक मिळविला आहे.कोरोना संकटामुळे सर्व व्यवहार ठप्प असताना अनेक अडचणी सर्वत्र व्यवसायात निर्माण झाल्या आहेत. मात्र त्यावर मात करून सभासदांना १२ टक्के लाभांश व कामगारांना २ महिन्याचा पगार बोनस म्हणून देऊन त्यांना न्याय देण्याचे काम अण्णासाहेब चोथे व सर्व सहकाऱ्यांनी केले आहे.

 प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले की, आदर्श पतसंस्था दरवर्षी सभासद व कामगार नाराज न राहता त्यांना खुश करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचे काम करते. सामाजिक व धार्मिक क्षेत्रात या संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

 यावेळी आसाराम राऊत, सतीश संसारे, यशवंत होले,  त्रिंबक मोरे, बाळासाहेब चोथे, उत्तमराव शेटे,या सभासदांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभांश वाटप  तर सभासद गोरक्षनाथ जाधव यांना ट्रॅक्टरचे वितरण माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास नगरसेवक सचिन ढुस, संजय बर्डे, मेजर राजेंद्र कडू, प्रदीप गरड, दीपक त्रिभुवन, वैभव गिरमे, विलास साळवे, सुनील सोनवणे, किशोर थोरात, संजय म्हसे, भागवत वाळुंज, मारुती हारदे, डॉ.बबनराव वाकचौरे, कांतीलाल लोढा, भाऊसाहेब वाळुंज, संदीप खुरुद, किशोर कोबरने, पिनू कोबरने, सुरेश चव्हाण, संचालक सर्वश्री शिवाजीराव कपाळे, आबासाहेब  वाळुंज, रामचंद्र काळे, हर्षद ताथेड, प्रकाश सोनी, सुभाष शेकडे, अविनाश साबरे, विष्णू गीते, भारत काळे, जनरल मॅनेजर  अशोकराव जाधव व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केले तर आभार प्रकाश सोनी यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News